जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मंदिरात जाण्याचं आणि प्रदक्षिणा मारण्याचं कारण काय ? सारा अली खाननं दिलं उत्तर

मंदिरात जाण्याचं आणि प्रदक्षिणा मारण्याचं कारण काय ? सारा अली खाननं दिलं उत्तर

मंदिरात जाण्याचं आणि प्रदक्षिणा मारण्याचं कारण काय ? सारा अली खाननं दिलं उत्तर

सारा आली खानने ती मंदिरात (Why Sara Ali Khan goes to temples) का जाते शिवाय ती मंदिराला का फेऱ्या मारते, या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या अतरंगी रे या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सारा आली खान नेहमी मंदिरात जातान दिसते. सारा धर्म, जात मानत नाही . तिला ज्या ठिकाणी जाण्यानं उत्साह मिळतो त्या ठिकाणी ती जात असते. मग ते गुरुद्वारा असो, मंदिर असो किंवा मशीद…यावरून सारा आली खानला अनेकवेळा ट्रोलिंगचा (Sara Ali Khan Trolled) सामना करावा लागला आहे. मात्र सारा आली खानला याचा काही फरक पडत नाही. ‘दैनिक भास्कर’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सारा आली खानने ती मंदिरात (Why Sara Ali Khan goes to temples) का जाते शिवाय ती मंदिराभोवती प्रदक्षिणा का मारते, या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. साराला मंदिरात जाण्याविषयी व मंदिराला प्रदक्षिणा मारण्याविषयी विचारण्यात आलं. यावर सारा म्हणाली की, मला मंदिरात गेल्यावर अनेक वाईट प्रतिक्रियेला सामोरं जावं लागतं. मला लोकं काय म्हणतात याचा काही एक फरक पडत नाही. मात्र विचारसरणी बदलण्याची गरज आहे. ती काळाची गरज असल्याची देखील तिनं सांगितलं. वाचा- तुमच्यासाठी खुर्ची सोडू पण..रोहित पवारांनी पंकजा व प्रणिती शिंदेंना घातली अट तसेच सारा पुढे म्हणते की, मी मंदिरात जाते कारण त्या ठिकाणी मला प्रसन्न वाटते व उत्साह मिळतो. मग ती प्रसन्नता मला कुठेही सापडते.. मंदिर असो, गुरुद्वारा असो किंवा सेटवरच्या लोकांमध्ये असो… मला लोकांच्यातील उत्साह आवडतो. तोच उत्साह आणि प्रसन्नता मला मंदिरात किंवा दर्ग्यात गेल्यानं मिळत असल्याचं तिंन यावेळी सांगितलं. मात्र यावरून मला काही कारण नसताना अनेकवेळा ट्रोल केलं जात असल्याचं तिनं सांगितलं. काही धर्माच्या रक्षकांनी धर्माचा ठेका घेतला आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते की, आपण जे काही करतो आहोत ते खरं आहे. वाचा- फोटोत दिसणारी ही ‘क्युट गर्ल’ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही चमकवतेय नाव सारा अली खानला प्रवास करायला, फिरायला आवडते. ती अनेकवेळा धार्मिक स्थळांना भेट देते. मागच्या काही दिवसापूर्वी सारा केदारनाथ ते महाकाल व आसामच्या कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. 2021 साली सारा ऑक्टोबरमध्ये राजस्थानमधील मेवाडमधील आराध्य श्रीएकलिंग नाथजी मंदिरालाही भेट दिली होती.

जाहिरात

यानंतर ती उदयपूर येथील नीमच मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावरून तिला  अनेकवेळा ट्रोल करण्यात आला. यावेळी काही धर्माच्या रक्षकांनी तिच्यावर व तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केला. काही नेटकऱ्यांनी तर तिला सारा आली खान या तिच्या नावामधून तिचं अडनाव खान काढून टाकण्याचा देखील सल्ला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात