जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : आम्ही तुमच्यासाठी ही खुर्ची सोडू पण... रोहित पवार यांनी पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदेंना घातली अट

VIDEO : आम्ही तुमच्यासाठी ही खुर्ची सोडू पण... रोहित पवार यांनी पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदेंना घातली अट

VIDEO : आम्ही तुमच्यासाठी ही खुर्ची सोडू पण... रोहित पवार यांनी पंकजा मुंडे आणि प्रणिती शिंदेंना घातली अट

किचन कल्लाकारमध्ये राजकीय खिचडी शिजणार आहे. यावेळी शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी -झी मराठीवर (Zee Marathi ) 15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार ( Kitchen Kallakar) हा शो सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. आता किचन कल्लाकारमध्ये राजकीय खिचडी शिजणार आहे. यावेळी शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत. याचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे. झी मराठीनं इन्स्टावर किचन कल्लाकारचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे दिसत आहेत. शोमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगल्याचे दिसत आहे. यावेळी रोहित पवार यांनी प्रणिती शिंदे व पंकजा मुंडे यांच्यासाठी खुर्चीचा त्याग केला.मात्र यावेळी त्यांनी रोहित पवार म्हणाले की, मी त्याग केला पण मला त्या खुर्चीसाठी मला मदत करायची आहे. यानंतर हा खेळ प्रणिती शिंदे या जिंकतात. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना युतीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा त्या गमतीनं म्हणाल्या की, मला माझ्या वरिष्ठांशी बोलावे लागेल..त्यांच्या या एका वाक्यावर सगळीकडे हास्य पसरते. वाचा- अबोली मालिकेत येणार नवं वळण; रेशम टिपणीस साकारणार महत्त्वाची भूमिका झी मराठीनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,युती होऊन खुर्ची मिळणार का ?.सध्या सगळ्यांना हा भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे. नेहमी राजकीय खिचडी शिजणारे हे राजकीय चेहरे किचन कल्लाकारमध्ये युती करून खुर्ची मिळवणार का याची उत्सुकता लागली आहे. नेहमी राजकीय खिचडी शिजवणारे हे चेहरे किचनमध्ये काय आणि कसं मॅनेज करणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे. राजकीय नेते म्हणून आपण या मंडळींना आपण पाहत असतो मात्र त्यांचा किचनमधला वावर कसा असतो याचा उलगडा देखील यानिमित्त आपल्या समोर येणार आहे.

जाहिरात

किचन कल्लाकारच्या सेटवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हजेरी लावत आहेत. या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत प्रशांत दामले काम पाहत आहेत. तर शो होस्ट करण्याची जबाबदारी संकर्षण कऱ्हाडे करत आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात