Home /News /entertainment /

ओळखा पाहू! फोटोत दिसणारी ही 'क्युट गर्ल' बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही चमकवतेय नाव

ओळखा पाहू! फोटोत दिसणारी ही 'क्युट गर्ल' बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही चमकवतेय नाव

बॉलिवूड (Bollywood) कलाकारांचे विविध फोटो पाहणं चाहत्यांना फारच आवडतं. त्यातल्या त्यात त्यांच्या बालपणीचे फोटो (Childhood Pic) असतील तर मग उत्तमच.

    मुंबई, 5 जानेवारी- बॉलिवूड  (Bollywood)  कलाकारांचे विविध फोटो पाहणं चाहत्यांना फारच आवडतं. त्यातल्या त्यात त्यांच्या बालपणीचे फोटो (Childhood Pic) असतील तर मग उत्तमच. अनेकांना आपला लाडका अभिनेता किंवा अभिनेत्री पूर्वी कसे दिसत होते? किंवा बालपणात ते दिसायला कसे होते? हे जाणून घ्यायला फारच आवडत. आज आम्ही तुम्हाला असाच एक फोटो दाखवणार आहोत. ज्यामध्ये असणारी ही गोंडस मुलगी आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री तर आहेच शिवाय तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवला आहे. आता तुमच्यासुद्धा लक्षात आलंच असेल फोटोमध्ये दिसणारी ही गोड मुलगी कोण आहे. परंतु जर ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra)  आहे. वाटलं ना आश्चर्य? हो ही देसी गर्ल आहे. आज प्रियांका चोप्राला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या करिअरमध्ये आज ती यशाच्या शिखरावर आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडलीच आहे. परंतु आज तिनं हॉलिवूडमध्येसुद्धा आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रियांका सध्या एक ग्लोबल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फक्त चित्रपटच नव्हे तर अभिनेत्री अनेक सामाजिक उपक्रमातसुद्धा अग्रेसर आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. चित्रपटांप्रमाणे ती सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहे. आज इन्स्टाग्रामवर तिचे 72. 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. असं होतं बालपण- अभिनेत्री प्रियांका चोप्राचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला होता. परंतु ती बरेलीला आपलं मूळ गाव समजते. तिचे वडील सैन्यदलात डॉक्टर होते. त्यामुळे तिचं कुटुंब एक सुशिक्षित कुटुंब होतं. ती किशोरवयात असताना, काही वर्षे आपल्या काकीजवळ अमेरिकेत वास्तव्यास होती. याठिकाणी तिनं आपल्या दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असतांना प्रियांका फारच हुशार होती. तिला इंजिनियर किंवा गुन्हेगारी मानसशात्र अशा क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. परंतु तिच्या नशिबात काही वेगळंच ठरलं होतं. परतल्यानंतर प्रियंकाने मिस फेमिना स्पर्धा जिंकली. त्यांनतर ती मिस वर्ल्डसाठी पात्र ठरली. फक्त पात्रच ठरली नाही तर अभिनेत्रीने 2000 मध्ये मिस वर्ल्ड हा 'किताब जिंकत आपल्या आयुष्याला यशाच्या शिखरावर नेलं. चित्रपट कारकीर्द- मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर अभिनेत्रीला अभिनयाचे दरवाजे खुले झाले होते. प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाची सुरुवात 'थमिजान' तामिळ चित्रपटातून केली होती. परंतु त्यांनतर तिने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला होता. प्रियांकाने 'द-हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट फारसा चालू शकला आहि. त्यांनतर तिने अंदाज मध्ये काम केलं यामध्ये तिच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. त्यांनतर प्रियंकाने अनेक चित्रपटांत काम केलं. तिच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक चढउतार आले, परंतु आज ती सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आज तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रियांका नुकताच हॉलिवूड चित्रपट 'द मॅट्रिक्स' मध्ये दिसली होती. वैवाहिक आयुष्य- अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूड अभिनेता आणि सिंगर निक जोनससोबत लग्न केलं आहे. महत्वाचं म्हणजे प्रियांका आणि निकमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. परंतु त्यांच्या नात्यावर याचा अजिबात फरक पडत नाही. ते दोघे एकमेकांसोबत फारच आनंदी आहेत. सतत ते सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment, Priyanka chopra

    पुढील बातम्या