मुंबई, 05 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या ‘लव्ह आजकल’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारानं 2018 मध्ये केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती सिंबामध्ये दिसली होती. लवकरच सारा आणि कार्तिक आर्यन यांचा ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सारानं तिच्या आई-वडीलांच्या नात्यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली.
सिनेमातील अभिनयासोबतच आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी सारा अली खान नुकतीच नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आई-वडीलांच्या नात्यावर बिनधास्त बोलली. यावेळी आई-वडीलांपैकी तुझ्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे असा प्रश्न साराला विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, आई आणि वडील दोघांवरही माझं खूप प्रेम आहे. पण माझ्यावर आईचा जास्त प्रभाव आहे. कारण तिने एकटीनं मला आणि इब्राहिमला मोठं केलं. मी आजही तिच्यासोबतच राहते. त्यामुळे ती माझी ताकद आणि प्रेरणा दोन्ही आहे. एवढंच नाही तर ती माझी सर्वात जवळची मैत्रीणही आहे.
दिशाचं 'हे' प्रेम तुम्हाला माहित आहे का? भारताच्या युवा खेळाडूबद्दल म्हणते...
साराला या मुलाखतीत तुझ्या आईवडीलांचा घटस्फोट झाला याबद्दल तुला खंत वाटते का? किंवा दुःख होतं का असा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली, मला वाटतं त्या दोघांचा घटस्फोट झाला हे योग्यच झालं त्यासाठी मी देवाचे आभार मानते. जर दोन माणसं एकमेकांसोबत खूश राहू शकत नसतील तर त्यांनी एकत्र राहण्यात काहीच अर्थ नसतो. अनेक नात्यांमध्ये असं होतं की ते दोघं आनंदी नसतात पण मुलांसाठी एकत्र राहण्याचा पर्याय स्वीकारतात. पण हे मला अजिबात पटत नाही.
अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला...
सारा पुढे म्हणाली, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल किंवा सुखी राहत नसाल तर तुमच्या मुलांना तुम्ही कसं आनंदी ठेवणार. जेव्हा आपण विमानातून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की अगोदर स्वतःला मास्क लावा आणि मगच दुसऱ्याची मदत करा. तसंच जर तुम्हीच तुमचं आयुष्य एन्जॉय करत नसाल तर मुलांना काय शिकवणार. आज माझ्याकडे एका दुःखी कुटुंबापेक्षा दोन सुखी कुटुंबं आहेत. त्यामुळे मला माझ्या आई-वडीलांच्या घटस्फोटात गैर काहीच वाटत नाही. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे.
View this post on Instagram
साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी सारा-कार्तिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sara ali khan