मुंबई, 05 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या मलंग सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या व्यतिरिक्तही दिशा पाटनी टायगर श्रॉफसोबतच्या मैत्रीमुळे सुद्धा चर्चेत असते. काही काळापूर्वी दिशाचं नाव पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सुद्धा जोडलं गेलं होतं. या दोघांचे डिनर डेटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यानंतर या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. या दोघांनंतर आता मात्र दिशाचं नाव भारतीय क्रिकेट टीममधील एका बॉलरशी जोडलं जात आहे. टीम इंडियांनं टी-20 सीरिजमध्ये न्यूझलंडला नुकताच व्हाइटवॉश दिला. त्यामुळे सध्या सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या करिअरच्या कमी काळातच जगातील सर्वात घातक गोलंदाजांमध्ये त्याची गिनती केली जाते. अनेक फलंदाज तर त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. खरं तर सध्या जगभरातून बुमराहचं कौतुक केलं जात आहे मात्र बॉलवूड अभिनेत्री दिशा पाटनीनंही त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आता दिशा पाटनीचं नाव जोडलं गेलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO
दिशानं केलं बुमराहचं कौतुक नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री दिशा पाटनीनं आपलं क्रिकेट प्रेम जाहिर करत जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं आहे. तिन बुमराहला भारताच्या विजयाचा शिल्पकार म्हटलं आहे. 2016 मध्ये एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशानं भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या मोंगानुई येथे झालेल्या पाचव्या टी-20 सामान्यावेळी ऑफिशिअल ब्रॉडकास्टर स्टुडिओमध्ये हजेरी लावली होती. मलंग सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिशा या स्टुडिओमध्ये आली होती. भावाच्या लग्नात करिना-करिश्माचे ठुमके, पाहा रॉयल वेडिंगचे INSIDE VIDEO
4 ओव्हरमध्ये 12 धावा देत घेतल्या 3 विकेट यावेळी दिशाला विचारण्यात आलं की, जर तुला एक मॅच विनिंग प्लेयर निवडायचा असेल तर तु कोणाला निवडशील. यावर तिनं जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. ती म्हणाली, ‘आपल्याकडे असलेल्या सर्व क्रिकेटपटूंमध्ये तो सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.’ पाचव्या टी-20 मध्ये बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या पूर्ण सामन्यात त्यानं 4 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावा देत 3 गडी बाद केले होते. एवढंच नाही तर या सामन्यातच त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला.
विराट कोहली सर्वांचा बॉस भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या टी-20 सामन्याच्या आधी जसप्रीत बुमराहचा खेळ काहीसा खालावला होता. पण या सामन्यातील त्याचं प्रदर्शन टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरलं. कमरेला दुखापत झाल्यानं काही काळासाठी बुमराह संघातून बाहेर होता. त्यानंतर त्यानं श्रीलंका सीरिजमध्ये पुन्हा एकदा संघात वापसी केली. दिशा पाटनीसोबतच मलंग सिनेमाची पूर्ण टीम यावेळी स्टुडिओमध्ये उरस्थित होती. अभिनेता अनिल कपूर यांना त्यांचा आवडता खेळाडू कोण असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी विराट कोहलीच सर्वांचा बॉस असल्याचं सांगितलं. सलमानच्या कार्यक्रमाला ISI एजंटचा पैसा? भाईजानने घेतला मोठा निर्णय

)







