Birthday Special : अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला...

Birthday Special : अभिषेक बच्चन घरात कोणाला घाबरतो? आई जया बच्चन यांना की बायको ऐश्वर्याला...

बच्चन कुटुंबामध्ये अभिषेक सर्वात जास्त कोणाला घाबरतो माहित आहे का?

  • Share this:

मुंबई, 05 फेब्रुवारी : अभिनेता अभिषेक बच्चन आज 44 वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूड कपल नेहमीच चर्चेत असतं. पण बच्चन कुटुंबामध्ये अभिषेक सर्वात जास्त कोणाला घाबरतो माहित आहे का? नवरा बायकोला जास्त घाबरतो की आईला याची चर्चा कुठल्याही फॅमिली किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये नेहमी गप्पांमध्ये होते. पण हीच चर्चा झाली होती कॉफी विथ करणमध्ये आणि स्वतः अभिषेक बच्चननं याचं उत्तर काय दिलं होतं..

कॉफी विथ करणच्या मागच्या वर्षीच्या एपिसोडमध्ये बच्चन कुटुंबीयांमधले हे भाऊ-बहीण अभिषेक आणि श्वेता यांनी हजेरी लावली होती. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन- नंदा यांनी होस्ट करण जोहरबरोबर गप्पा मारताना अनेक घरगुती आणि फिल्मी विषयांवर मनस्वीपणे मतं व्यक्त केली होती.

भावाच्या लग्नात करिना-करिश्माचे ठुमके, पाहा रॉयल वेडिंगचे INSIDE VIDEO

 

View this post on Instagram

 

Happy New Year.

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

या कार्यक्रमाचा शेवटचा भाग असतो रॅपिड फायर. हा भाग नेहमीच उत्सुकतेचा असतो. यामध्ये करण आलेल्या पाहुण्यांना काही अडचणीचे तर काही उत्सुकतेचे प्रश्न विचारतो. अभिषेक आणि श्वेता या भावंडांच्या रॅपिड फायर राउंडमध्ये करणने असेच धमाल उडवून देणारे प्रश्न विचारले होते.

 

View this post on Instagram

 

Cuppa Joe with the elder sister and brother. #koffeewithkaran @karanjohar @shwetabachchan

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

करणनं अभिषेकला तू घरात सगळ्यांत जास्त कुणाला घाबरतोस? बायकोला की आईला? हा प्रश्न विचारल्यावर अभिषेकने पटकन आईला असं उत्तर देऊन टाकलं. पण यावर श्वेताचं म्हणणं मात्र वेगळं होतं. बहीण श्वेताच्या मते मात्र अभिषेक आईला - जया बच्चन यांना घाबरत नाही, तर बायको ऐश्वर्याला जास्त घाबरतो.

सलमानच्या कार्यक्रमाला ISI एजंटचा पैसा? भाईजानने घेतला मोठा निर्णय

 

View this post on Instagram

 

Birthday girl. #aboutlastnight

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

श्वेतानं तिचं मत असं जाहीरपणे सांगितल्यावर अभिषेकही लटक्या रागाने बहिणीला म्हणाला, 'प्रश्न मला विचारलाय तर तू उत्तर का देतेयस?' श्वेताच्या चेहऱ्यावरचे मिष्किल भाव मात्र बघण्यासारखे होते. अभिषेक-श्वेताचा हा एपिसोड खूप चर्चेत राहिला होता. सलमान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्यानं 2007 मध्ये अभिषेकशी लग्न केलं. या दोघांना आराध्या नावाची 8 वर्षांची मुलगी सुद्धा आहे.

'माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम' लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेशची जेनेलियाकडे कबुली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2020 10:29 AM IST

ताज्या बातम्या