Home /News /entertainment /

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समोर आला आमिर खानचा नवा लुक, पाहा PHOTO

आमिरनं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळचे त्याचे नव्या लुकमधील फोटो समोर आले आहेत.

    मुंबई, 05 फेब्रुवारी : अभिनेता आमिर खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढामुळे खूप चर्चेत आहे. आमिरनं या सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली असून या सिनेमातील त्याचा लुक काही दिवसांपूर्वी समोर आला होता. पण या सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर मात्र आमिरचा नवा लुक पाहायला मिळाला. आमिरनं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळचे आमिरचे नव्या लुकमधील फोटो समोर आले आहेत. आमिरनं नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाबाबत चर्चा केली. नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्वीटरवरून दिली. त्यांनी लिहिलं, ‘हिंदी सिनेजगतातील सुप्रसिद्ध अभिनेत आमिर खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमांबाबत चर्चा केली. याप्रसंगी पाणी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव उपस्थित होत्या.’ सलमानच्या कार्यक्रमाला ISI एजंटचा पैसा? भाईजानने घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमिरच्या या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात तो नव्या लुकमध्ये दिसत आहे. याआधी आमिरनं लाल सिंह चढ्ढा या सिनेमासाठी दाढी आणि केस वाढवले होते. पण नुकत्याच समोर आलेल्या या फोटोंमध्ये आमिरन क्लिन शेव्ह आणि शॉर्ट हेअर कटमध्ये दिसत आहे. 'माझं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम' लग्नाच्या 8 वर्षानंतर रितेशची जेनेलियाकडे कबुली आमिरचा लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा हॉलिवूडच्या ऑस्कर विजेत्या‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं असून किरण राव आणि आमिर खानची निर्मिती आहे. हा सिनेमा यंदाच्या ख्रिसमला म्हणजेच 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Tanhaji कडून बॉक्स ऑफिसचा गड सर, 25 व्या दिवशी केली इतकी कमाई
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या