मुंबई, 06 मार्च : अभिनेत्री सारा अली खान नेहमीच काही ना कारणानं चर्चेत असतेच. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिचा लव्ह आज कल हा सिनेमा जेमतेम चालला मात्र कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीची चर्चा मात्र खूप झाली. त्यानंतर आता सारा पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सारानं नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.
सारा अली खाननं भाऊ इब्राहिमच्या वाढदिवसाला काही फोटो शेअर केले होते. सारानं हे फोटो शेअर करताना इमोशनल पोस्ट लिहिली आहे, हॅप्पीएस्ट बर्थ डे ब्रदर, मी तुझ्यावर तुला माहित आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त प्रेम करते. आज तुझी खूप आठवण येत आहे. किती चांगलं झालं असतं आज मी तुझ्यासोबत असते. या कॅप्शनसह सारानं 2 फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती इब्राहिमसोबत पोज देताना दिसत आहे. मात्र काही लोकांना तिचा हा अंदाज आवडलेला नाही. ज्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Birthday Special : बॉलिवूड पदार्पणाआधीच लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती जान्हवी
सारानं शेअर केलेले हे फोटो तिच्या जुन्या व्हेकेशनचे आहेत. या फोटोवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, असे फोटो शेअर करुन बर्थ डे विश कोण करतं? दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, तुला जराही लाज वाटत नाही का? तुझ्या भावाकडे पहा तो तुला स्पर्शही करत नाही आहे. तर आणखी एका युजरनं लिहिलं, तु बिकिनी फ्लॉन्ट न करताही भावासोबत इब्राहिमसोबत चांगली पोज देऊ शकत होतीस.
कडाक्याच्या थंडीत असं झालं होतं 'राजा हिंदुस्तानी'च्या KISSING सीनचं शूट!
काही युजर्सनी साराला ट्रोल करायचा प्रयत्न केल्यानंतर तिचे चाहते मात्र तिला सपोर्ट करताना दिसत आहेत. तिच्या एका चाहतीनं लिहलं, लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ते दोघं भाऊबहिण आहेत आणि ती तिच्या भावासोबत कम्फर्टेबल आहे. तुमची पण फॅमिली आहे ना? काही विचार करुन कमेंट करा.

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शूटिंग संपल असून सारानं तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुद्धा सुरू केलं आहे. या सिनेमाचं नाव 'अतरंगी रे' असं असून त्याचं दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे. या सिनेमात सारा अली खान धनुष आणि अक्षय कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
भगवान रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला केला जातो 'बोल्ड' फोटो शूटचा आग्रह मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.