मुंबई, 06 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर मागच्या बऱ्याच काळापासून सिल्व्हर स्क्रिनपासून दूर आहे. पण तिचा लुक, फिटनेस आणि सोशल मीडियामुळे ती नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती एकता कपूरची वेब सीरिज ‘मेंटल हुड’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या करिश्मा या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत या वेब सीरिज बद्दल बोलतानाच तिनं तिचा ब्लॉकबस्टर सिनेमा राजा हिंदुस्तानीच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मेंटल हुड’च्या प्रमोशन दरम्यान करिश्मानं नुकतीच ‘स्पॉटबॉय-ई’ मुलाखत दिली. यावेळी तिनं तिच्या राजा हिंदुस्तानी सिनेमाच्या आठवणी ताज्या तर केल्याच पण यासोबतच अभिनेता आमिर खान बद्दलही ती मनमोकळेपणानं बोलली. 1996 मध्ये रिलीज झालेला ‘राजा हिंदुस्तानी’ हा सिनेमा आमिर आणि करिश्माच्या लिपलॉक सीनमुळे खूपच चर्चेत राहिला होता. आज सिनेमातील किसिंग सीन समान्य बाब असली तरीही त्यावेळी मात्र हे धाडसाचं काम होतं. त्यामुळे हा सीन प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आमची कला म्हणजे ‘तमाशा’ आणि त्यांची ‘नटश्रेष्ठ..’,‘या’ संघटनेकडून सुजयची पाठराखण
‘राजा हिंदुस्तानी’मधील त्या सीन बद्दल बोलताना करिश्मा म्हणाली, फेब्रुवारी महिना होता. आम्ही उटीमध्ये या सिनेमाच शूटिंग करत होतो. या सिनेमाशी जोडलेल्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. हा किसिंग सीन शूट करण्यासाठी आम्हाला तब्बल 3 दिवस लागले होते. या सीन शूटिंग कधी संपतं असं आम्हाला झालं होतं. कारण त्यावेळी उटीमध्ये खूप गार हवा आणि कडाक्याची थंडी होती आणि अशा अवस्थेत आम्ही हा सीन शूट केला. ‘…तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील’
करिश्मा पुढे म्हणाली, या सीनच्या शूटिंगसाठी आम्ही सकाळी एवढ्या थंडीत 7 वाजता बाहेर पडत असू आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करयचं. टेक्सच्या मध्ये एवढी थंडी लागत असे की आम्ही अक्षरशः थरथर कापायचो. त्यामुळे अशा अवस्थेत किसिंग सीन शूट करणं खूपच अवघड काम होतं. ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका…’ मालिका वादात शशांक केतकरची उडी करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्या राजा हिंदुस्तानी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या सिनेमातील किसिंग सीन त्यावेळी खूप गाजला होता. मात्र त्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत आणि कडाक्याच्या थंडीतही केलेलं शूटिंग हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हा सिनेमा अद्याप प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.