Birthday Special : बॉलिवूड पदार्पणाआधीच लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती जान्हवी कपूर
'धडक' सिनेमातून दमदार डेब्यू करणारी जान्हवी त्या अगोदरच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती.
|
1/ 8
श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा आज 23 वा वाढदिवस. 'धडक' सिनेमातून दमदार डेब्यू करणारी जान्हवी त्या अगोदरच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती.
2/ 8
2018 मध्ये जान्हवीनं इशान खट्टरसोबत धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याआधी ती अक्षत रंजनसोबतच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली होती. अक्षत हा तिचा बालमित्र आहे.
3/ 8
जान्हवीच्या 21 व्या वाढदिवसाला अक्षतनं त्याच्या इन्स्टाग्रामवर जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्याच्या कमेंटमध्ये जान्हवीनं आय लव्ह यू असं लिहिलं होतं. त्यानंतर त्याच्या नात्याच्या चर्चा सुरू झाली होती.
4/ 8
या नंतर अक्षतच्या प्रोफाइलवर जान्हवीचे फोटो सतत दिसू लागले होते. सूत्राच्या माहितीनुसार जान्हवी अक्षतला डेट करत होती. मात्र तिनं मीडियासमोर हे नातं कधीच मान्य केलं नाही.
5/ 8
काही काळानं जान्हवी आणि अक्षतमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. त्यावर एका मुलाखतीत जान्हवीनं आमच्याबद्दल अफावा पसरत असल्यानं आम्ही सार्वजनिक ठिकाणी भेटणं बंद केल्याचं सांगितलं होतं.
6/ 8
अक्षत व्यतिरिक्त जान्हवीचं नाव शिखर पहारिया सोबत जोडलं गेलं होतं. शिखर हा माजी केंद्रीय मंत्री सुशिल कुमार शिंदे यांचा नातू आहे. मात्र जान्हवीनं याबद्दल कधीच काही कमेंट केली नाही.
7/ 8
शिखर नंतर जान्हवीचं नाव जोडलं गेलं ते तिचा को-स्टार इशान खट्टरसोबत. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. तसेच जान्हवीला भेटायला इशान तिच्या घरी जात असल्याचं बोललं गेलं होतं.
8/ 8
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लवकरच ती ‘गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तिच्या ‘तख्त’ आणि ‘रुही अफजा’ हे दोन सिनेमा आहेत.