Home /News /entertainment /

जेंव्हा भगवान रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला केला जातो 'बोल्ड' फोटो शूटचा आग्रह

जेंव्हा भगवान रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला केला जातो 'बोल्ड' फोटो शूटचा आग्रह

भारताच्या बहुसंख्य हिंदू जनतेसाठी आदर्श आणि पूजनीय प्रभू श्रीराम यांच्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला आपण बोल्ड फोटो शूटमध्ये पाहू शकतो का? अर्थातच याचं उत्तर नाही असंच असेल. पण असा प्रसंगाचा देशभरात गाजलेल्या रामायण या मालिकेतल्या प्रभू रामचंद्रांची भूमिका करणाऱ्या कलाकाराला सामना करावा लागला होता. आणि त्याची कहाणी सुद्धा खूप रंजक अशा प्रकराची आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, दि. 6 मार्च, प्रतिनिधी : भारताच्या बहुसंख्य हिंदू जनतेसाठी आदर्श आणि पूजनीय प्रभू श्रीराम यांच्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला आपण बोल्ड फोटो शूटमध्ये पाहू शकतो का? अर्थातच याचं उत्तर नाही असंच असेल. अशा प्रसंगाचा देशभरात गाजलेल्या रामायण या मालिकेतल्या प्रभू रामचंद्रांची भूमिका करणाऱ्या कलाकाराला सामना करावा लागला होता. आणि त्याची कहाणी सुद्धा खूप रंजक अशा प्रकराची आहे. दूरदर्शनवर एक काळ गाजवलेल्या 'रामायण' या मालिकेतील कलाकार नुकतेच कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये आले होते. त्यावेळी रामाची भूमिका करणारे अभिनेते अरूण गोविल, लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लहरी, सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्यासह काही कलाकार उपस्थित होते.  यावेळी रामाची भूमिका करणाऱ्या अरूण गोविल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हे नक्की वाचा : मराठी मालिका आणि ब्राह्मण अभिनेत्री... वादात आता संभाजी ब्रिगेडनेही घेतली उडी बोल्ड फोटोसाठी होता आग्रह कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये तत्कालिन रामायण मालिकेतील प्रमुख तीनही कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना अरूण गोविल यांनी मोठा खुलासा केला. ' रामायण मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अनेक चित्रपट मासिकं आमच्याकडे फोटो शूटसाठी आग्रह करत होते. देशात आम्हाला मोठा मान होता. कारण आम्ही सगळ्यात लोकप्रिय अशा मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण अशी पात्र साकारत होतो. त्यावेळी काही फिल्मी मासिकांनी आम्हाला बोल्ड फोटो शूटसाठी खूप आग्रह केला होता. इतकंच नाही कर आमच्यातल्या काही जणांना अशा फोटो शूटसाठी मोठ्या पैशांचं आमिष दाखवण्यात आलं होतं.' असा दावा सुद्धा गोविल यांनी केला आहे. सध्या काय करतात तेंव्हाचे राम, लक्ष्मण सीता? रामानंद सागर यांनी 'रामायण' मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. त्याकाळी देसात न वापरले गेलेले अनेक व्हिडीओ इफेक्ट त्या मालिकेत उत्तम पद्धतीने वापरले होते. 33 वर्षांपूर्वी ही मालिका पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. इतकंच नाही तर रविवारी ही मालिका प्रसारित होत असतांना देशात बंद सदृष्य स्थिती होत असे, लोकं टिव्ही समोरून हालत नसतं हे अनेकांनी अनुभवलं आहे. पण सध्या रामायण मालिकेतील लक्ष्मण अर्थात सुनील लहरी  यांनी रामायणातल्या रामा सोबत अर्थात अरुण गोविल यांच्या सह 'राम लक्ष्मण प्रॉडक्शन कंपनी' सुरु केली. यामार्फत आत्ता सुद्धा विविध प्रकारच्या टिव्ही कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. तर सीतेचं काम केलेल्या दीपिका चिखलिया यांनी 1911  मध्ये भाजप च्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्या खासदार होत्या. नंतर त्यांनी हेमंत टोपीवाला यांच्यासोबत लग्ले केलं. सध्या त्यांचा कॉस्मेटिकचा मोठा व्यवसाय असून दीपिका कंपनीच्या मार्केटिंग हेड आहेत.

    हे नक्की वाचा : कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण

    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या