जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / विकी कौशलच्या चित्रपटातून सारा आऊट, होणार या साऊथ सुंदरीची एन्ट्री!

विकी कौशलच्या चित्रपटातून सारा आऊट, होणार या साऊथ सुंदरीची एन्ट्री!

सारा अली खान, विकी कौशल

सारा अली खान, विकी कौशल

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सैफ अली खानची लाडकी लेक अनेकदा मीडियावर चर्चेत असते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूड  अभिनेत्री सारा अली खान  ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सैफ अली खानची लाडकी लेक अनेकदा मीडियावर चर्चेत असते. आता तिच्याबद्दल आणखी एक बातमी येत असून सारा  विकी कौशल च्या आणि तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सारा अली खानला रिप्लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे साराचे चाहते नाराज झाले आहेत. सारा आणि विकीचे चाहते अनेक दिवसांपासून अश्वत्थामा चित्रपटाची वाट पाहत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चित्रपटाशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सारा अली खानला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून साइन करण्यात आले होते. पण आता सारा या चित्रपटातून बाहेर पडली आहे. हेही वाचा -  ‘बॉलिवूडमध्ये महिलांना वस्तू म्हणून विकतात’, अभिनेत्री राधिका आपटे असं का म्हणाली? निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, विक्कीपेक्षा वयाने मोठी दिसणारी अभिनेत्री या चित्रपटात कास्ट करणार आहे. आता चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या आधीच्या स्क्रिप्टनुसार, तरुण स्त्री पात्र चित्रपटात दाखवायचे होते, म्हणून साराला साइन करण्यात आले. पण, आता कथा बदलली आहे. नुसार एका अशा अभिनेत्रीला घ्यायचे आहे, जी चित्रपटाचा मुख्य अभिनेता विकी कौशलपेक्षा वयाने मोठी आहे. मेकर्सनी समंथा रुथ प्रभूच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आहेत. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

जाहिरात

दरम्यान, प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक आदित्य धरचा आगामी ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत रोज काही ना काही बातम्या येत असतात. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. त्यामुळे आता कोणती अभिनेत्री साराला रिप्लेस करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान,आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आल्पावधीतच तिनं आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. कधी मजेशीर शायरीमुळे, कधी ग्लॅमरस लुकमुळे, तर कधी कॉमेडी व्हिडीओंमुळे ती कायम चर्चेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात