मुंबई, 27 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनय आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे राधिकाने प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप सोडली आहे. हिंदी व्यतिरिक्त, तामिळ, तेलुगू, मराठी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये राधिकानं काम केलं आहे. राधिकाने ‘बदलापूर’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमध्ये सेक्स कॉमेडी भूमिका केल्या होत्या. त्यानंतर तिला अशाच भूमिका ऑफर होऊ लागल्या. याविषयी नुकत्याच झालेल्या एक मुलाखतीत राधिका बोलली आहे. 2015 मध्ये बदलापूर रिलीज झाल्यानंतर, राधिका आपटेला काही सेक्स कॉमेडीमध्ये जास्त भूमिकांची ऑफर देण्यात आली होती. या चित्रपटामध्ये राधिकाने अभिनेता विनय पाठकच्या पत्नीची भूमिका केली होती आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला होता. चित्रपटाचे यश आणि राधिकाच्या पात्राची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी राधिकासाठी सेक्स कॉमेडी भूमिका आणल्या. मात्र, अभिनेत्रीने या ऑफर्स नाकारल्या. हेही वाचा - धक्कादायक! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं; परस्त्रीसोबत पकडल्याने केला कांड, CCTV फुटेज VIRAL राधिकाने बॉलीवूड हंगामाला एका मुलाखतीत सांगितले, “मला वाटते की बदलापूरनंतर मला काही सेक्स कॉमेडी ऑफर करण्यात आली होती. मला सेक्स कॉमेडी करायला हरकत नाही. हंटर हा चित्रपट देखील एक सेक्स कॉमेडी होता पण, बॉलीवूडमध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे सेक्स कॉमेडी चित्रपट आहेत. महिलांची अवहेलना झाली आहे. बघितले तर बॉलीवूडमध्ये सेक्स कॉमेडीच्या नावाखाली महिलांची विक्री होते आणि मला अशी कॉमेडी आवडत नाही. त्यामुळे मी ते करत नाही.”
या प्रकारात महिलांना काहीतरी वस्तू म्हणून सादर केले जाते. त्यामुळेच त्याला भारतीय सिनेमाची सेक्स कॉमेडी आवडत नाही.जेव्हा कोणी तिच्यासमोर या शैलीशी संबंधित स्क्रिप्ट वाचते तेव्हा तिला समजते की हा चित्रपट काय आहे आणि कोणत्या प्रकारचे विनोद केले आहेत, असंही राधिका म्हणाली.
दरम्यान, बोल्ड बिंदास अभिनेत्रीची फिल्मी कारकीर्द पाहता, तिने नेहमीच आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये काम केले. राधिकाने ‘पॅड मॅन’, ‘मांझी-द माऊंटमॅन’, ‘अंधाधुन’, ‘बदलापूर’, ‘पार्च्ड’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.