मुंबई, 08 जुलै : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड म्हणजे सारा अली खान. सैफ अली खानची लेक आपल्या बिनधास्त अंदाजामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. तिचा चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे. अवघ्या काही काळातच साराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढंच नाही तर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. कार्तिक आर्यनसोबत ब्रेकअपनंतर तिचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं जातं. पण आता साराने वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
सारा अली खान सध्या विकी कौशलसोबत तिचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट जरा हटके जरा बचकेच्या यशाचा आनंद घेत आहे. लक्ष्मण उतेकर निर्मित हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला असून रिलीज होऊन एक महिना उलटूनही हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवत आहे. सारा अली खान तिच्या साध्या राहणीसाठीही प्रसिद्ध आहे. अलीकडेच सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत सुट्टीसाठी गेली होती, मात्र आता ती मुंबईत परतली आहे. आता मुंबईत परतताच मान्सूनचा आनंद घेण्यासाठी सारा अली खान तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर पडली आणि पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी साराने चक्क रिक्षात प्रवास केला. 3 Idiots Sequel: 15 वर्षानंतर येणार 3 इडियट्सचा सिक्वेल? शर्मन जोशीने दिली मोठी अपडेट सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सारा अली खानचा हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. सारा तिच्यासमोर पापाराझी पाहून हैराण होते. ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असते, मग तिची नजर समोर उभ्या असलेल्या पापाराझीकडे जाते. साराची नजर पॅप्सवर पडताच ती त्यांना विचारते, “तुम्ही कसं आम्हाला? साराच हा व्हिडीओ व्हायरल होत असून तिची ऑटो राईड चर्चेत आहे.
तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सारा मुंबईच्या किनाऱ्यावर मनसोक्त फिरताना दिसत आहे. सारा मैत्रिणीसोबत गप्पा मारत मान्सूनचा आनंद घेत आहे. साराच्या या साधेपणावर चाहते फिदा झाले असून तिचं कौतुक करत आहे. साराच्या साधेपणा आणि नम्रतेवर कमेंट करत एकाने लिहिलं, “ती खूप डाउन टू अर्थ मुलगी आहे’, तर दुसऱ्या एकाने तिची तुलना इतर स्टारकिड्स सोबत करत ‘सेलेब्सच्या मुलांमध्ये खूप गर्विष्ठपणा पाहिला आहे, पण ही खूप गोड आहे.“असं म्हटलं आहे. सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सारा नेहमीच पॅप्स सोबत आपलेपणानं संवाद साधताना दिसते. तिच्या याच गुणामुळे ती चाहत्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.