जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 3 Idiots Sequel: 15 वर्षानंतर येणार 3 इडियट्सचा सिक्वेल? शर्मन जोशीने दिली मोठी अपडेट

3 Idiots Sequel: 15 वर्षानंतर येणार 3 इडियट्सचा सिक्वेल? शर्मन जोशीने दिली मोठी अपडेट

 3 इडियट्स

3 इडियट्स

अभिनेता शर्मन जोशी याने आमिर खान स्टारर चित्रपटाच्या सिक्वेल विषयी मोठी अपडेट दिली आहे. 3 इडियट्समध्ये शर्मन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. काय म्हणाला शर्मन जोशी जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 जुलै :  3 इडियट्स हा बॉलिवूडमधील ऑल टाइम हिट चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खान, आर.माधवन आणि शर्मन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केला होता. आता   ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता अभिनेता शर्मन जोशी याने आमिर खान स्टारर चित्रपटाच्या सिक्वेल विषयी मोठी अपडेट दिली आहे. 3 इडियट्समध्ये शर्मन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. काय म्हणाला शर्मन जोशी जाणून घ्या. आमिर खान स्टारर ‘3 इडियट्स’ या सिनेमाचा सिक्वेल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राजकुमार हिरानी रँचो, फरहान आणि राजू या त्रिकुटाला पुन्हा पडद्यावर आणण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे. शर्मन जोशी यांनी खुलासा केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शर्मन जोशीने 2009 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘3 इडियट्स’मध्ये राजूची भूमिका साकारली होती. आता शर्मनने या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. इंडिया टुडेशी संवाद साधताना अभिनेता म्हणाला की, ‘या चित्रपटाच्या सिक्वेलविषयी आम्ही एकमेकांसोबत अनेक कल्पना शेअर केल्या आहेत.  ज्या आमच्या आधीही केल्या होत्या पण त्या आम्ही पुढे नेऊ शकलो नाही. तुम्हाला माहिती आहे की राजकुमार हिरानी हे  सिक्वेलवर उत्तम काम करतात, पण हिरानी सरांना या चित्रपटासाठी अजून योग्य कथा सापडलेली नाही. ते कथेच्या क्वालिटीमध्ये तडजोड करत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व जण आशा करतोय की सगळ्या गोष्टी लवकरच जुळून येतील आणि हा चित्रपट तयार होईल." Manoj Muntashir: अखेर आदिपुरुष’च्या लेखकांनी हात जोडून मागितली माफी; नेटकरी म्हणाले ‘तुम्ही संधीसाधू…’ काही काळापूर्वी आमिर खान ‘3 इडियट्स’ नंतर पहिल्यांदाच शर्मन जोशी आणि आर माधवनसोबत दिसला होता. या तिघांनीही एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. या तिघांनाही एकत्र पाहिल्यावर लोकांना वाटू लागलं की, आता लवकरच हे तिघे ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. मात्र, जेव्हा ही एक जाहिरात असल्याचं लोकांना कळलं तेव्हा त्यांची घोर निराशा झाली. यामुळे तिन्ही स्टार्सना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर शर्मनला त्यासाठी शिव्या देखील खाव्या लागल्या. याविषयी बोलताना शर्मन म्हणाला की, “ज्यावेळी चाहत्यांना कळले की ही जाहिरात आहे, तेव्हा त्यांची खूप निराशा झाली. एवढेच नाही तर आम्हाला चाहत्यांकडून शिवीगाळही झाली. खूप दिवसांनी पुन्हा एकत्र काम करताना खूप मजा आली. मी देखील या मोहिमेचा एक भाग होतो. या मोहिमेत सहभागी होणं माझ्यासाठी खूप छान अनुभव होता.’’ शर्मन जोशीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कफास’ या वेब सिरीजला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 6 भागांची ही वेब सिरीज सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात