मुंबई, 11 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांचा आगमी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. हा सिनेमा व्हेलेंटाइन डेला रिलीज होत आहे. त्याआधी सारानं या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साराला तिच्या लग्नासंबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले आणि सारानंही या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देत तिच्या लग्नाचा सिक्रेट प्लान शेअर केला.
सारा अली खाननं लव्ह आजकल सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान नुकतंच एका वेबसाइडला मुलाखतीत साराला तिच्या वेडिंग प्लानविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावर सारानं तिला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात डेस्टिनेशन वेडिंग करायचं असल्याचं सांगितलं. सारा नेहमीच तिच्या व्हेकेशनसाठी न्यूयॉर्कला पसंती देते. अनेकदा ती या ठिकाणचे फोटो शेअर करताना दिसते. ज्यातून तिचं या शहरावरील प्रेम दिसून येतं.
शाहरुखची लेक पुन्हा एकदा चर्चेत, सुहानाचा सेल्फी सोशल मीडियावर VIRAL
सारा अली खान छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी असल्यानं तिचं लग्न कसं असेल असाही एक प्रश्न तिला यावेळी विचारण्यात आला. त्यावर सारा म्हणाली, मी रॉयल फॅमिलीत जन्माला आले असले तरीही मला लग्न मात्र अत्यंत साध्या पद्धतीनं करायचं आहे. साराच्या या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सारा कितीही मोठी स्टार झाली असली तरीही तिचे पाय अद्यापही जमिनीवर असल्याचं तिच्या या उत्तरातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. इतर वेळीही बाकीच्या नवोदित अभिनेत्रींच्या तुलनेत सारा पॅपराजींसोबत नम्रतेने वागताना दिसते. आपुलकीनं त्यांची चौकशी करताना दिसते.
जॉन सीनालाही लागलंय Bigg Boss चं याड! असिम रियाजचा फोटो शेअर करुन म्हणाला...
'लव्ह आजकल' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. शूटिंगच्या वेळी आणि शूटिंग नंतरही हे दोघं अनेकादा एकत्र दिसले होते. नुकताच कार्तिकनं साराला जेवण भरवतानाचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर सारा आणि कार्तिकला इम्तियाज अली यांनी त्यांच्या सिनेमासाठी कास्ट केलं होतं.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्या सुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे.
‘फी वाढवण्यासाठी सलमान देतो शो सोडण्याची धमकी’, भाईजानवर कोणी केला गंभीर आरोप