Bigg Boss 13 : ‘फी वाढवण्यासाठी सलमान देतो शो सोडण्याची धमकी’, भाईजानवर कोणी केला गंभीर आरोप

Bigg Boss 13 : ‘फी वाढवण्यासाठी सलमान देतो शो सोडण्याची धमकी’, भाईजानवर कोणी केला गंभीर आरोप

चार महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या Bigg Boss 13 चा ग्रॅन्ड फिनाले 15 फेब्रुवारीला होणार आहे. पण त्यापूर्वी सलमानवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : बिग बॉसचा 13 वा सीझन संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाच्या या सीझनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चार महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या शोचा ग्रॅन्ड फिनाले 15 फेब्रुवारीला होणार आहे. सध्या घरात 7 स्पर्धक उरले आहेत. या रविवारी घरातील एकही सदस्य बाहेर पडला नाही. दरम्यान सोमवारी झालेल्या एपिसोडमध्ये सलमान पुन्हा एकदा दिसला. यासोबत यावेळी नीना गुप्ता, आयुष्मान खुराना जितेंद्र कुमार यांनी हजेरी लावली. याशिवाय या शोमध्ये रजत शर्मा यांनीही हजेरी लावली आणि सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत त्याला अनेक प्रश्न विचारले. तसेच यावेळी त्यांनी सलमानवर एक धक्कादायक आरोपही केला.

बिग बॉसच्या शोमध्ये रजत शर्मा यांनी घरातील सर्व सदस्यांची कनेक्शन्स तोडण्याचा आरोप करत तू असं का करतोस असा प्रश्न विचारला. ज्यावर सलमाननं माझं कोणाशी कनेक्शन होत नाही त्यामुळे मी असं करतो असं मजेदार उत्तर दिलं. यानंतर रजत यांनी, ‘स्वतःची फी वाढवण्यासाठी तू हा शो सोडण्याची धमकी वारंवार सर्वांना देत असतोस.’ असा आरोप केला. त्यावर सलमानलाही हसू आवरेनासं झालं.

ऑस्कर मिळालं नाही तरी कोट्यवधींचा फायदा, नामांकनासाठी मिळतो महागडा गिफ्ट बॉक्स

 

View this post on Instagram

 

and will not let anyone marry too 😆👿 #bb13 #biggboss13 #salmankhan #ayushmankhurana #neenagupta #rashmidesai #rajatsharma #ViralBhayani @colorstv @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सलमानला प्रश्न विचारत असताना रजत शर्मा म्हणाले, ‘सलमान तू हा शो मागच्या 10 वर्षांपासून होस्ट करत आहेस. पण मी दरवर्षी हे ऐकतो की तू हा शो सोडत आहेस. हे नक्की काय चाललं आहे. मला वाटतं तू स्वतःची फी वाढवून घेण्यासाठी असं करत आहेस. यावर सलमान हसू लागतो आणि म्हणतो या सर्व फक्त धमक्या आहेत कारण हे लोक माझी फी काही वाढवत नाहीत.’

'दीपवीर नेमके आहेत कुठे?', दीपिकाच्या विचित्र पोस्टमुळे फॅन्स संभ्रमात

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो त्याचा आगमी सिनेमा राधेच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात अभिनेत्री दिशा पाटनी सलमान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा यावर्षी ईदच्या दिवाशी रिलीज होत आहे. याशिवाय सलमानकडे कभी ईद कभी दिवाली हा सिनेमा सुद्धा आहे. जो 2021च्या ईदला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे.

शाहरुखला अबराहमने मारली किक, किंग खानची हालत झाली खराब! PHOTO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2020 09:14 AM IST

ताज्या बातम्या