मुंबई, 11 फेब्रुवारी : पॉप्युलर स्टार किड्समध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचं नाव नेहमीच चर्चेत असतं. सध्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेली सुहाना सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिचं सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट असलं तरीही तिच्या फॅनपेज वरुन तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी सुहानाचा एक सेल्फी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुहानाच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सुहाना खानचे हे फोटो तिच्या फॅनपेजवरुन शेअर करण्यात आले होते. त्यानंतर काही काळातच हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये सुहाना तिच्या मैत्रिणीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. यावेळी या दोघीही खूपच मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. काहींनी तर सुहानाला सेल्फी क्वीन असं नाव देऊन टाकलं आहे. हा फोटोंवर लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
‘फी वाढवण्यासाठी सलमान देतो शो सोडण्याची धमकी’, भाईजानवर कोणी केला गंभीर आरोप
View this post on Instagram
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये सुहाना आणि तिची मैत्रीण ब्लॅक कलरच्या आउटफिट्समध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. खरं तर सुहानानं अशाप्रकारे हॉट सेल्फी शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीही तिचा असाच एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती जीभ बाहेर काढून सेल्फी घेताना दिसली होती.
नेहा-आदित्यच्या लग्नात मोठा ट्वीस्ट, उदित नारायण यांच्या खुलाशानं फॅन्सना धक्का
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सुहानाचा एका व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात सुहाना प्रसिद्ध रॅपर एमिनेमचं सुपरहिट ‘ब्यूटिफुल’ हे गाणं गाताना दिसत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. ते पूर्ण झाल्यावर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असं बोललं जात आहे. तसं पाहायल गेलं तर सुहानानं काही दिवसांपूर्वीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिची शॉर्ट फिल्म ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती.
ऑस्कर मिळालं नाही तरी कोट्यवधींचा फायदा, नामांकनासाठी मिळतो महागडा गिफ्ट बॉक्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Suhana khan