मुंबई, 11 फेब्रुवारी : बिग बॉस 13 च्या फिनालेसाठी आता फक्त 4 दिवस उरले आहेत. 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या शोनं प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन केलं. यंदाचा हा सीझन वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला. आता घरात आसिम रियाज, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, शहनाझ गिल, पारस छाब्रा, आरती सिंह आणि माहिरा शर्मा एवढेच स्पर्धक राहिले आहेत. पण या शोमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले ते आसिम आणि सिद्धार्थ या दोघांनाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे. त्यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे ज्यात आता WWE रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचं नाव जोडलं जात आहे. त्यानं पुन्हा एकदा आसिमचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
जॉन सीनानं आसिमचा फोटो शेअर करण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यानं आसिमचा फोटो शेअर केल्यानंतर बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण अवघ्या 4 दिवसांतच जॉननं पुन्हा एकदा आसिमचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यावरुन स्पष्ट होतं की आसिम बिग बॉसचा विजेता व्हावा असं जॉनला वाटत आहे. जॉनचा सोशल मीडियावर तगडा चाहता वर्ग आहे. त्यामुळे जर त्यानं आसिमसाठी वोट केलं तर आसिमला बिग बॉसचा विजेता होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे बाकी स्पर्धकांचे चाहते हैराण झाले आहेत.
नेहा-आदित्यच्या लग्नात मोठा ट्वीस्ट, उदित नारायण यांच्या खुलाशानं फॅन्सना धक्का
View this post on Instagram
नुकतंच जॉन सीनानं आसिम रियाजचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात आसिम एका खुर्चीवर बसला आहे आणि त्याच्या समोर एक टेबल आहे आणि त्यासमोर लावल्या एका पेपरवर #AsimRiazForTheWin असं लिहिलं आहे. सध्या जॉन सीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवरुन हे स्पष्ट होतं की तो आसिमचा चाहता आहे आणि या सीझनचा विजेता आसिम व्हावा असं त्याला वाटतं. जॉन नेहमीच त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅन्डम पोस्ट शेअर करताना दिसतो.
ऑस्कर मिळालं नाही तरी कोट्यवधींचा फायदा, नामांकनासाठी मिळतो महागडा गिफ्ट बॉक्स
View this post on Instagram
बिग बॉसचा 13 वा सीझन संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाच्या या सीझनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चार महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या शोचा ग्रॅन्ड फिनाले 15 फेब्रुवारीला होणार आहे. सध्या घरात 7 स्पर्धक उरले आहेत. या रविवारी घरातील एकही सदस्य बाहेर पडला नाही. दरम्यान सोमवारी झालेल्या एपिसोडमध्ये सलमान पुन्हा एकदा दिसला. यासोबत यावेळी नीना गुप्ता, आयुष्मान खुराना जितेंद्र कुमार यांनी हजेरी लावली. याशिवाय या शोमध्ये रजत शर्मा यांनीही हजेरी लावली आणि सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत त्याला अनेक प्रश्न विचारले. तसेच यावेळी त्यांनी सलमानवर फी वाढवण्यासाठी शो सोडण्याच्या धमक्या देत असल्याचा धक्कादायक आरोपही केला.
'दीपवीर नेमके आहेत कुठे?', दीपिकाच्या विचित्र पोस्टमुळे फॅन्स संभ्रमात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.