मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी कौशल बनणार साराचा पती! रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार ही जोडी

विकी कौशल बनणार साराचा पती! रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार ही जोडी

लक्ष्मण उतेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी विकी कौशल आणि सारा अली खानचं नाव फायनल करण्यात आलं आहे.

लक्ष्मण उतेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी विकी कौशल आणि सारा अली खानचं नाव फायनल करण्यात आलं आहे.

लक्ष्मण उतेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी विकी कौशल आणि सारा अली खानचं नाव फायनल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,7ऑक्टोबर- अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) आज प्रत्येक तरुणाईचे आवडते कलाकार आहेत. त्यांचे चित्रपटसुद्धा सुपरहिट होत असतात. विकीने विविध धाटणीच्या चित्रपटातुन आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. तर दुसरीकडे कमर्शिअल चित्रपटांसाठी साराला मोठी मागणी आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार एकत्र आले तर चाहत्यांसाठी मेजवानीच असणार आहे. आणि असं लवकरच होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघेही लवकरच एकत्र झळकणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर यांच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी विकी कौशल आणि सारा अली खानचं नाव फायनल करण्यात आलं आहे. दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप दिवस झाले उत्सुक आहेत. मात्र लवकरच ही उत्सुकता पूर्ण होणार आहे. याआधीही सारा अली खान आणि विकी कौशलला एकत्र घेऊन यामी गौतमचा पती अर्थातच आदित्य धरने ‘द इम्मॉरटल अश्वत्थामा’ बनवण्याचं प्लॅनिंग केलं होतं. हि बातमी समोर येताच चाहते उत्सुक झाले होते. या दोघांना फायनल करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव चित्रपट बनू शकला नाही. त्यामुळे चाहते निराश झाले होते. मात्र या नव्या चित्रपटाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

(हे वाचा:सेट तयार, व्हॅनिटी तयार मात्र, Shahrukhचा शेवटच्या क्षणी Ajay सोबत शुटिंगला नकार)

हा चित्रपट सारा आणि विकीच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईजचं असणार आहे. कारण या चित्रपटात हे दोघेही पती-पत्नीच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. तसेच चित्रपटाची कथा हि रोमँटिक कॉमेडी असणार आहे. यामध्ये हे कपल आपलं स्वतःच घर असावं असं स्वप्न पाहताना दाखवण्यात येणार आहे. तसेच चित्रपटात पंतप्रधान घरकुल योजनेची माहिती करून देतानाही दिसून येणार आहे.संपूर्ण चित्रपट या गोष्टी भोवतीच असणार आहे. त्यामुळे चित्रपटात विकी आणि साराच्या रोमॅन्ससोबतचं ड्रामा आणि कॉमेडीसुद्धा पाहायला मिळणार आहे.

(हे वाचा:HBD: अडखळत बोलणारा शरद केळकर असा बनला 'बाहुबली'मध्ये प्रभासचा आवाज !)

या चित्रपटाचं शूटिंग उज्जैन, ग्वालेहर आणि उत्तर प्रदेशमध्ये केलं जाणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला आयुष्यमान खुरानाला साईन करण्यात येणार होतं. मात्र काही कारणास्तव असं नाही झालं आणि या चित्रपटात विकीची वर्णी लागली. या चित्रपटाबद्दल बोलताना डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे, 'हा चित्रपट मध्य प्रदेशवे आधारित असणार आहे. ही कथा एका छोट्याशा गावातील असणार आहे. तसेच मला खूप दिवसांपासून विकीसोबत काम करायचं होतं. आणि सारा तर या चित्रपटासाठी एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे चित्रपट उत्तम होणार यात काही शंका नाही.

First published:

Tags: Entertainment, Sara ali khan, Vicky kaushal