मुंबई, 7ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan) अभिनेता अजय देवगनसोबत**(Ajay Devgn)** शूटिंग करण्यास ऐनवेळी नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला अजय देवगनसोबत स्क्रीनवर झळकायचं होतं. असा योगायोग जुळूनही आला होता. चित्रपट नव्हे तर एका जाहिरातीच्या माध्यमातून हे दोन दिग्गज कलाकार एकत्र येणार होते. मात्र सध्या हे होताना दिसत नाहीय. (हे वाचा: शेवटी आईच काळीज! Aryan Khan साठी गौरी बर्गर घेऊन पोहोचली, पण … ) शाहरुख खान आणि अजय देवगन यांना एका जाहिरातीसाठी एकत्र साईन करण्यात आलं आहे. चित्रपट नाही मात्र जाहिरातीत तरी एकत्र काम करत असल्याचा या दोन्ही कलाकारांना आनंद होता. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंगची सर्व तयारी करण्यात आली होती. सेटही तयार करण्यात आला होता. शाहरुख खानसाठी २० ते २५ बाउंसरही तयार ठेवण्यात आले होते. त्याची व्हॅनिटी व्हॅनही सज्ज होती. सेटवर सर्व लोक शाहरुख खानच्या प्रतीक्षेत होते. मात्र किंग खान शारुखने यावेळी आपली प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण नाही केली. शाहरुखने अगदी शेवटच्या क्षणाला सेटवर जाण्यास नकार कळवल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्याने ऐनवेळी शूटिंग कॅन्सल केली आहे. (**हे वाचा:** aryan khan arrest case : आर्यन खानला ताब्यात घेणारा निघाला भाजपचा … ) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे शाहरुख आणि संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावात असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणामुळे शाहरुखने शूटिंग कॅन्सल केल्या सर्वांचा अंदाज आहे.आर्यन खानच्या अटकेमुळे शाहरुख खानने ‘पठाण’चं देखील शूटिंग अर्धवट सोडलं होतं. सध्या आर्यन खान NCB च्या कस्टडीत आहे. आर्यनसह अन्य सात लोकांना एका हायक्लास क्रूझमधील रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.