मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: अडखळत बोलणारा शरद केळकर असा बनला 'बाहुबली'मध्ये प्रभासचा आवाज !

HBD: अडखळत बोलणारा शरद केळकर असा बनला 'बाहुबली'मध्ये प्रभासचा आवाज !

 आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला ४५ वा वाढदिवस (45th Birthday Today) साजरा करत आहे.

आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला ४५ वा वाढदिवस (45th Birthday Today) साजरा करत आहे.

आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला ४५ वा वाढदिवस (45th Birthday Today) साजरा करत आहे.

मुंबई,7ऑक्टोबर- छोटापडदा (Tv) ते बॉलिवूड (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाने आपली ओळख बनवणारा अभिनेता म्हणून शरद केळकरला (Sharad Kelkar)ओळखलं जात.शरदने छोटा पडदा, बॉलिवूड, मराठी चित्रपट, डबिंग अशा सर्वच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला ४५ वा वाढदिवस (45th Birthday Today) साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्या काही माहिती नसलेल्या गोष्टींवर एक नजर टाकूया.

अभिनेता शरद केळकर हे आज एक प्रसिद्ध नाव बनलं आहे. शरदच जन्म ७ ऑक्टोबर १९७६ मध्ये झाला होता. या अभिनेत्याने छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीला मालिकांमध्ये दिसणारा हा अभिनेता आज वेबसीरीजमध्येही दिसून येत आहे. अलीकडेच शरद प्रचंड लोकप्रिय झालेल्या 'फॅमिली मॅन'वेबसिरीजमध्ये दिसला होता. यामध्ये तिच्या अभिनयाची मोठी प्रशंसा झाली होती. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. शरदने अभिनयासोबतच डबिंगमध्येही आपलं नाव कमावलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या आवाजात परफेक्शन आणण्यासाठी अफाट मेहनत घेतली आहे. आणि हे सिद्ध केलं आहे जर मनापासून एखादी गोष्ट ठरवली तर ती आपल्याला आत्मसात होतेच.

(हे वाचा:शरद-कीर्तीची प्यारवाली लव्हस्टोरी; 'या' मालिकेच्या सेटवर पहिली भेट, पहिलं प्रेम)

फारच कमी लोकांना माहिती आहे, साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली' च्या हिंदी डबिंगसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे. बाहुबली अर्थातच प्रभासच्या तोंडातून दमदार वाटणारा तो आवाज शरद केळकरचा आहे. मात्र शरद केळकरने आपल्या आवाजासाठी खूप कष्ट घेतले आहेत. कारण त्याला बालपणापासून स्पीच डिसऑर्डरचा त्रास होता. अर्थातच बोलताना तो मोठ्या प्रमणात अडखळत होता. त्यामुळे त्याची खिल्ली उडवली जात असे. अनेक वेळा त्याला रिजेक्शनही सहन करावं लागलं होतं.

(हे वाचा:रितेश म्हणतो, 'जेनेलियाची स्मरणशक्ती अद्भुत', त्यावर बिग बी म्हणाले...)

एका मुलाखती दरम्यान शरदने सांगितलं होतं. 'मला २००३ मध्ये एका मालिकेत भूमिका मिळाली होती. २... ३ दिवस सर्वकाही ठीक होतं. मात्र नंतर मला दीड पानांचा डायलॉग म्हणायचा होता. मात्र त्यावेळी मी अडखळायला लागलो. त्यामुळे तब्बल ३० रिटेक घ्यावे लागले. तरीही शॉट परफेक्ट झाला नाही. त्यामुळे डायरेक्टर माझ्या जवळ आले आणि काय अडचण आहे विचारलं. त्यामुळे हि मालिका माझ्या हातातून गेली. मात्र तरीही शरदने हार नाही मानली. त्याने आपल्या आवाजावर प्रचंड मेहनत घेतली. आणि त्याचा रिजल्ट आज सर्वांच्या समोर आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment