मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Gangubai Kathiawadi Movie Review: वजनदार आहे 'गंगूबाई', हृदयाला भिडणारे डायलॉग

Gangubai Kathiawadi Movie Review: वजनदार आहे 'गंगूबाई', हृदयाला भिडणारे डायलॉग

संजय लीला भन्साळींच्या  (Sanjay Leela Bhansali)  'गंगूबाई काठियावाडी'  (Gangubai Kathiawadi)  या चित्रपटाची गेली कित्येक दिवस तुफान चर्चा आहे. आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि अजय देवगन  (Ajay Devagn)  यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची गेली कित्येक दिवस तुफान चर्चा आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगन (Ajay Devagn) यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची गेली कित्येक दिवस तुफान चर्चा आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगन (Ajay Devagn) यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 फेब्रुवारी-   संजय लीला भन्साळींच्या  (Sanjay Leela Bhansali)  'गंगूबाई काठियावाडी'  (Gangubai Kathiawadi)  या चित्रपटाची गेली कित्येक दिवस तुफान चर्चा आहे. आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि अजय देवगन  (Ajay Devagn)  यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट अखेर आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.सोशल मीडियावर आलिया भट्ट, अजय देवगन ते विजय राज या सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान आता चित्रपटाचा रिव्ह्यू   (Movie Review)  समोर आला आहे.

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, 'गंगूबाई काठियावाडी' ही गंगूबाईच्या खऱ्या आयुष्यावर आधारित कथा आहे. जी मुंबईचा रेड लाईट एरिया कामाठीपुराला नवसंजीवनी देते. गंगा हरजीवनदास नावाच्या या मुलीला मुंबईत येऊन एक प्रसिद्ध अभिनेत्री व्हायचं होतं. तिच्या या निरागस स्वप्नाचा फायदा घेत तिचा प्रियकर तिला मुंबईत घेऊन येतो. आणि तिला केवळ 1000 रुपयांना मुंबईत विकतो. गंगा त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी प्रचंड आरडाओरडा करते, मारहाण करते. परंतु त्याचा काही एक उपयोग होत नाही. शेवटी ती या व्यवसायाचा एक भाग बनते. गंगा नावाची ही मुलगी इथे गंगू बनते. परंतु हळूहळू ती कामाठीपुरावर राज्य करायचं ठरवते.

सुरुवातीला ट्रेलर पाहून असं वाटत होतं की आलिया भट्ट थोडी ओव्हर ऍक्टिंग करत आहे. किंवा ती जबरदस्ती या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जेव्हा तुम्ही चित्रपट भाग्याला चालू करता काही वेळेतच तुम्हाला आलियाचा विसर पडतो. आणि तुम्ही फक्त गंगूबाईला पाहू लागता. तिचं आयुष्य समजून घेऊ लागता. या चित्रपटात आलिया पूर्णपणे गंगूबाई बनलेली जाणवतं. या चित्रपटात सीमा पाहवा, विजय राज, अजय देवगण, शंतनू माहेश्वरी असे अनेक कलाकार आहेत. परंतु सर्वजण एक -एक भागात आहेत. हे सर्व कलाकार आलियाच्या या चित्रपटाला आणखी मजबूत करण्याचं काम करत आहेत. अभिनेत्री सीमा पाहवा यांनी शीलाबाईंची व्यक्तिरेखा अप्रतिम साकारल्याचा इथे उल्लेख करावा लागेल.

या अजय देवगन एका छोट्या परंतु महत्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटात त्याची एन्ट्री फारच भव्य दाखविण्यात आली आहे. चित्रपटातील आलियाचे संवाद अप्रतिम आहेत. आलियाने आझाद मैदानात जे भाषण दिले ते अप्रतिम आहे. बघा, चित्रपटात काही वेगळी कथा नाही. परंतु गंगू मुंबईला चित्रपटात काम करण्यासाठी येते. आणि नंतर तिच्यासोबत जे घडत जातं या सर्व गोष्टी एकत्र करून चित्रपट तयार करण्यात आला आहे.

या चित्रपटासाठी अडचणीची बाब ही आहे, की सुरुवातीपासूनच चित्रपट एका वेश्याव्यवसायिक स्त्रीवर आधारित असल्याचा गाजावाजा झाला आहे. त्यामुळे कुटुंबासोबत चित्रपट पाहायला जावा कि नको यात प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. परंतु दिग्दर्शकांनी या सर्व गोष्टींचा विचार करून अशी दृश्ये फारच सांभाळून काळजीपूर्वक चित्रित केली आहेत.

(हे वाचा:Gangubai Kathiawadi साठी आलिया-अजयला मिळाली भरमसाठ रक्कम,वाचा कुणाला किती मानधन)

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा सेट खूप महत्त्वाचा असतो. या चित्रपटातही सेटचा वापर करण्यात आला आहे. परंतु चांगली गोष्ट म्हणजे यावेळी खोटेपणा अर्थातच ग्राफिक्स कमी आहेत. जुन्या मुंबईचा परिसर लक्षात घेऊन दृश्ये अतिशय सुंदर चित्रित करण्यात आली आहेत. मला हा चित्रपट आवडला. माझ्या बाजूने 3.5 स्टार देत असल्याचं दीपिका शर्मा यांनी News 18 हिंदीला रिव्ह्यू देताना म्हटलं आहे.

First published:

Tags: Ajay devgan, Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Movie release, Movie review, Sanjay Leela Bhansali