आलिया भट्ट आणि अजय देवगन यांचा बहुचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी चित्रपटाचे ट्रेलर पाहून आलियासोबत सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. या सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी किती रक्कम घेतली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार,प्रत्येक कलाकाराने या चित्रपटासाठी लाखो-कोटी रुपये आकारले आहेत.
या चित्रपटात अभिनेते विजय राज एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसून येत आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 1.5 कोटी आकारले आहेत.
अभिनेत्री हुमा कुरैशीने या चित्रपटात छोट्याश्या परंतु महत्वाच्या भूमिकेसाठी तब्बल 2 कोटी घेतेले आहेत.
अभिनेता आणि डान्सर शंतनु महेश्वरी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी त्याला 50 लाख मानधन देण्यात आलं आहे.