मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी लंडन, अमेरिका नाही थेट गाठणार 'हा' देश

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी लंडन, अमेरिका नाही थेट गाठणार 'हा' देश

 समांथा रूथ प्रभू

समांथा रूथ प्रभू

सामंथा रुथ प्रभूने तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे असे सांगितले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आता तिच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 01 डिसेंबर :  दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र काही दिवसांपासून समांथा सोशल मीडियापासून दूर आहे. ती सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून समांथाची तब्येत ठीक नसून ती एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. सामंथा रुथ प्रभूने तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे असे सांगितले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत याविषयी माहिती दिली होती.  आता तिच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

समंथा रुथ प्रभू सध्या मायोसिटिस या गंभीर आजाराने त्रस्त आहे. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती या आजाराशी सध्या धाडसी वृत्तीने झुंज देत आहे. पण आता तिच्या प्रकृतीविषयी अजून एक माहिती समोर येत आहे. समांथा तिच्या या आजारावर चांगले उपचार घेण्यासाठी दक्षिण कोरियाला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - Arjun Kapoor : काही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं...'

तमाम तरुणांची नॅशनल क्रश म्हणजेच साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी सामना करत आहे. काल समंथा रुथ प्रभू ला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण होतं. पण तिच्या सहकाऱ्याने  ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं. आता समंथा तिच्या उपचारासाठी दक्षिण कोरियाला जाणार अशी माहिती समोर आली आहे.

काही रिपोर्टनुसार सांगितले जातेय कि, समंथा अपेक्षे इतक्या वेगाने बरी होत नाहीये. हा आजार पूर्ण बरा करण्यासाठी  तिला आयुर्वेदिक उपचारांवर भर द्यायचा होता पण आता तिचा आजार बरा होत नसल्याने ती दक्षिण कोरियाहून उपचार घेणार आहे.' असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभू काही महिने दक्षिण कोरियामध्ये राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियामध्ये तिची तब्येत सुधारेपर्यंत  ती राहणार आहे. लवकरच बरं होऊन 'खुशी' चित्रपटाच्या शुटिंगवर परतण्याचे सामंथाचे ध्येय आहे.' या चित्रपटात तिच्यासोबत विजय देवरकोंडा देखील असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान समांथाचा यशोदा हा सिनेमा नुकताच  11 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने 30 कोटींहून अधिक कलेक्शन केले असून समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही समंथाच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत समांथानं तिच्या आजाराविषयी अपडेट दिली होती. बोलता बोलता समांथाला अश्रू अनावर झाले होते. समांथाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मायोसिटिसने पीडित रुग्णाच्या शरीराच्या आतून सूज येऊ लागते. असे म्हटले जाते की ही सूज सामान्यतः खांदे, हात, पाय, मांड्या, कंबर या  स्नायूंमध्ये येते, परंतु जेव्हा अन्ननलिका, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो तेव्हा ती धोकादायक बनते.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment