मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Arjun Kapoor : काही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं...'

Arjun Kapoor : काही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं...'

मलायका अरोरा-अर्जुन कपूर

मलायका अरोरा-अर्जुन कपूर

अलीकडेच मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची अफवा पसरली होती. अर्जुन कपूरने ही अफवा पसरवणाऱ्यांवर सडकून टीका केली होती. पण तरी अजूनही त्याचा राग शांत झालेला नाही. सोशल मीडियावर त्याने पुन्हा पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 01 डिसेंबर : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना इंडस्ट्रीचे पॉवर कपल म्हटले जाते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येतात. दोघांनीही या गोष्टींवर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मलायकावर काही संकट आले तर अर्जुन तिच्यासोबत कायम  उभा असतो. अलीकडेच मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची अफवा पसरली होती. ही बातमी वाचून अर्जुन कपूरचा संताप झाला होता.  त्याने ही अफवा पसरवणाऱ्यांवर सोशल मीडियावर सडकून टीका केली होती. पण तरी अजूनही अर्जुन कपूरचा राग शांत झालेला नाही. सोशल मीडियावर त्याने पुन्हा पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

अर्जुन कपूरने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. पुन्हा संताप व्यक्त करत त्याने लिहिलंय कि, ''प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ मिळतात. आयुष्यभर तुम्ही इतर लोकांशी वैर करू शकत नाही. तुम्ही कोण आहात? याचा मला फरक पडत नाही. तुम्ही जसं वागणार तसंच तुम्हाला सगळं परत मिळणार. ब्रम्हांड तुम्हाला तुमच्या कर्माची फळं लवकर किंवा उशीर का होईना पण भोगावी लागतातच.'' अशा शब्दात त्याने ही  अफवा पसरवणाऱ्यांना  फैलावर घेतलं आहे.

हेही वाचा - हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

अर्जुन कपूरच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की मलायकाच्या आई होण्याच्या अफवा ऐकून अभिनेत्याचा राग अजून शांत झालेला नाही. अलीकडेच 'या जोडप्याने मलायका प्रेग्नेंट असल्याची गोड बातमी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या जवळच्या मित्रांना दिली होती.' अशी बातमी समोर आली होती. पण  ही बातमी पसरताच अर्जुनकपूर चांगलाच भडकला होता.

काल त्याने ''अत्यंत खालच्या थराला जाऊन आणि तेही अगदी सहजरित्या तुम्ही ही बातमी दिली. यातून असंवेदनशील व अनैतिकपणा दिसतो. रोज अशा बातम्या तुम्ही देत आहात, ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका”, असं अर्जुनने म्हटलं होतं. आता आज पुन्हा अर्जुनने पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे. मलायकाच्या पाठीशी अर्जुन ज्या प्रकारे उभा राहिला आहे ते पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.

अर्जुन- मलायका गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2019 मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी एका पोस्टद्वारे दोघांनी नाते अधिकृत केले होते. तेव्हापासून दोघेही रोमँटिक डेट आणि व्हेकेशनवर दिसले. 2023 मध्ये दोघेही लग्न करू शकतात अशा बातम्या अलीकडे आल्या होत्या, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण चाहत्यांना मात्र या दोघांचं लग्न पाहण्याची इच्छा आहे.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Bollywood News, Malaika arora