मुंबई, 24 नोव्हेंबर: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. समांथा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र काही दिवसांपासून समांथा सोशल मीडियापासून दूर आहे. ती सध्या एका वेगळ्याच अडचणीत सापडल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून समांथाची तब्येत ठीक नसून ती एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. सामंथा रुथ प्रभूने तिला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे असे सांगितले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत याविषयी माहिती दिली होती. आता तिच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. तमाम तरुणांची नॅशनल क्रश म्हणजेच साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी सामना करत आहे. काल समंथा रुथ प्रभू ला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यशोदा फेम अभिनेत्री समंथा हिला नुकतेच मायोसिटिसचे निदान झाले होते, तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’ त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण होतं. हेही वाचा - Ruchira jadhav : बिग बॉसमधून बाहेर पडताच रुचिरा डेटवर; पोस्ट करत म्हणाली ‘शेवटी जाऊन भेटलेच त्याला…’ मात्र आता याविषयी मोठी अपडेट समोर आली असून समंथाच्या सहकार्याने ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी, समांथाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या.समंथाची तब्येत अचानक बिघडली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले अशी बातमी आली होती. पण आता, तिच्या सहकार्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार समंथा रुग्णालयात नसून घरी विश्रांती घेत आहे आणि तिची तब्येत एकदम ठीक आहे.
दरम्यान समांथाचा यशोदा हा सिनेमा नुकताच 11 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने 30 कोटींहून अधिक कलेक्शन केले असून समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही समंथाच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत समांथानं तिच्या आजाराविषयी अपडेट दिली होती. बोलता बोलता समांथाला अश्रू अनावर झाले होते. समांथाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
समांथा या आजाराबद्दल म्हणाली होती कि, ‘मी माझ्या आजाराविषयी सांगितलं आणि त्यानंतर त्याविषयीच्या अनेक बातम्या पाहिल्या. त्यांच्या हेडलाइन्स वाचून मी खूप अस्वस्थ झाले. माझ्यासाठी हे खूप खतरनाक होत मी सांगू इच्छिते की मी अजून जिवंत आहे. माझा आजार हा जिवघेणा नाहीये’. त्यानंतर चाहत्यांकडून अभिनेत्रीबद्दल काळजी आणि शुभेच्छा आल्या आहेत.