मुंबई, 15 एप्रिल: अनेक चित्रपटांतून विलनची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी हिरो ठरला आहे. अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा जनसामान्यांसाठी एक वेगळ्या प्रकारची मदत घेऊन येणार असल्याचं समजतं आहे. मागील लॉकडाउन (lockdown) मध्ये अनेक लोकांची विशेषता स्थलांतरीत मजदूरांची मदत केल्यानंतर सोनू सूद चर्चेत आला होता. व त्यानंतर त्याने अनेक प्रकारे वेगवेगळ्या त्याने लोकांची कधी आर्थिक तर कधी शैक्षणिक अशी मदत केली. तर आता सोनूचं आणखी एक ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यामुळे सोनू आता नक्की काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. ट्विट (tweet) मध्ये त्याने लिहीलं आहे. ‘महामारीची सगळ्यात मोठी शिकवण… देश वाचवायचा असेल तर दवाखाने बनवावे लागतील’. तेव्हा आता सोनू दवाखाना निर्माण करण्याचा तर विचार करत नाही ना असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पण त्यावर सोनूने अजून काहीच स्पष्ट भाष्य केलं नाही.
या नव्या ट्विट मुळे त्याच्या फॉलोवर्सने त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी लिहिलं दवाखाने असले तरीही त्यात डॉक्टर्स असायला हवेत. तर काहींनी लिहिलं तुमची शिकवण आवडली तर काहींना सोनू नवा दवाखाना काढणार आहे का असाही प्रश्न पडला.
रणबीर कपूरनं लग्न का केलं नाही?; आईनंच सांगितली अभिनेत्याची वाईट सवययाशिवाय सोनू ने कोरोना काळात बोर्ड परिक्षा रद्द व्हाव्यात यासाठू विद्यार्थ्यांच्या आंदोलणाला (students protest against board exams) साथ दिली होती. अखेर प्रशासनेने विद्यार्थ्यांच म्हणणं ऐकून घेत परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोनूने ‘शेवटी हे झालचं… सगळ्या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा’ असं ट्विट त्याने केलं होतं.
समझो हो गया।
— sonu sood (@SonuSood) April 15, 2021
Monday सर्जरी हो जायेगी। @IlaajIndia @SoodFoundation@drkvask #sisterthomasamma https://t.co/SjV49aielI
सोनूच्या ‘सोनू सूद या फांउडेशन’ (sonu sood foundation) तर्फे तो रोज अनेकांना निरनिराळ्या प्रकारची मदत करतो. तर ट्विट करत मदत पोहोचल्याचही गरजू त्याला सांगतात. त्याच्या ट्विटर हॅन्डल वर तो ही माहीती शेअर करत असतो.