'शराबी'मध्ये BIG B यांचा हात खिशातच का होता? 36 वर्षांनंतर सांगितलं कारण

'शराबी'मध्ये BIG B यांचा हात खिशातच का होता? 36 वर्षांनंतर सांगितलं कारण

प्रसिद्ध चित्रपट ‘शराबी’ (sharabi)मध्ये अमिताभ यांनी आपला डावा हात खिशामध्ये घालून शुटींग पूर्ण केलं होतं. त्यापाठीमागचा रोमांचकारक किस्सा त्यांनी स्वतः पोस्ट करत सांगितला आहे.

  • Share this:

तमुंबई, 15एप्रिल- बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेता(bollywood best actor) म्हणून अमिताभ बच्चन (amitabh bacchan)यांना ओळखलं जातं. त्यांना ‘बिग बी’ (big b)या नावानं ओळखलं जातं.बॉलीवूडमध्ये येणारे प्रत्येक कलाकार त्यांना आपला आदर्श म्हणून समोर ठेवतात. वयाच्या 78व्या (amitabh bacchan 78 years old)वर्षीसुद्धा त्यांचा उत्साह एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवेल असाच आहे.अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. या माध्यमातून ते सतत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. विविध जुने फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसाठी शेअर करत असतात. आणि आपल्या चित्रिकरणादरम्यान घडलेले विविध किस्से चाहत्यांना सांगत असतात. प्रसिद्ध चित्रपट ‘शराबी’ (sharabi)मध्ये अमिताभ यांनी आपला डावा हात खिशामध्ये घालून शुटींग पूर्ण केलं होतं. त्यापाठीमागचा रोमांचकारक किस्सा त्यांनी स्वतः पोस्ट करत सांगितला आहे.

अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांच्या भूमिका असणारा ‘शराबी’ हा चित्रपट हॉलीवूड मधील ‘ऑर्थर’(aurther) या चित्रपटावर आधारित आहे. याचा हिंदी रिमेक शराबी लोकांना इतका आवडला की त्याचा तमिळ रिमेकसुद्धा तयार करण्यात आला होता. त्याचं नाव ‘थंडा कनिके’ (thanda kanike)असं होतं.

शराबी हा चित्रपट पाहून सर्वांनाच असं वाटत की अमिताभ बच्चन यांनी स्टाईल म्हणून आपला डावा हात खिशात ठेवला होता. मात्र याचं खरं कारण वेगळचं आहे. यापाठीमागे खरं कारण हाताची दुखापत  होतं. अमिताभ बच्चन यांनी स्वतः खुलासा करत सांगितलं होतं. की दिवाळीमध्ये फटाके उडवत असताना त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यांचा हात पूर्णपणे भाजून निघाला होता. इतका की की तो ‘तंदूरी चिकन’ सारखा भासत होता. तरीसुद्धा त्यांनी चित्रीकरण पूर्ण केलं होतं. आणि हाताची दुखापत लपवण्यासाठी ही युक्ती केली होती.

(अवश्य वाचा: Nyay The Justice : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी फिल्मचा टिझर; उलगडणार अनेक 'राज')

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी सुद्धा त्यांना सल्ला दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की तू या चित्रपटात एका बिघडलेल्या मूलाची आणि दारूच्या आहारी गेलेल्या, टपोरी मुलाची भूमिका साकारणार आहेस. त्यामुळे तुझा हात तू खिशात घाल. चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर लोकांना ते इतक आवडलं की लोक त्याला एक स्टाईल समजू लागले. अमिताभ सोबत या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार सुद्धा होते. जया प्रदा, प्राण,ओम प्रकाश यांनी सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

(अवश्य वाचा:  99 songs' च्या रिलीजआधी ए. आर. रहमान यांचं गिफ्ट; पाहा स्पेशल कॉन्सर्ट)

1986 मध्ये शराबी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून,  फिल्मफेअर सोहळ्यात एकाच चित्रपटासाठी, एकाच विभागात चार नामंकने मिळाली होती. अशी ही पहिली आणि शेवटचीचं गोष्ट होती. तसेच किशोर कुमार यांना ‘मंजिले अपनी जगह, और रास्ते अपनी जगह साठी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्याचबरोबर बप्पी लहरी यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून सुद्धा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यावर्षी अमिताभच्या या चित्रपटासाठी फिल्मफेयर मध्ये एकूण 9 नामांकने मिळाली होती. मात्र आपणाला सांगू इच्छितो की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मात्र अनुपन खेर यांना मिळाला होता. सारांश या चित्रपटासाठी.

Published by: Aiman Desai
First published: April 15, 2021, 4:43 PM IST

ताज्या बातम्या