मुंबई, 10 फेब्रुवारी : यावर्षी ऑस्कर पुरस्कारांदरम्यान दक्षिण कोरियाने बाजी मारली. ‘पॅरासाईट’ या सिनेमाला 4 पुरस्कार मिळाले. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान आणखी एका गोष्टीची चर्चा होते आणि ती म्हणजे ऑस्कर नामांकन मिळालेल्या कलाकारांना मिळणारे गिफ्ट बॉक्स! या गिफ्ट बॉक्सची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार या गिफ्ट बॉक्सची किंमत 1 कोटी 53 लाख 25 हजार 307 रुपये इतकी आहे. नामांकन मिळालेल्या कलाकारांना पुरस्कार मिळो अथवा न मिळो त्यांना हा कोट्यवधींचा गिफ्ट बॉक्स मिळतोच मिळतो.
ऑस्कर 2020 च्या गिफ्ट बॉक्समध्ये आहेत या ‘खास’ गोष्टी
-स्पेनमधील लाईटहाउसमध्ये रोमँटिक वेकेशन. याठिकाणी एक रात्र घालवण्यासाठी साधारण 1 लाख रुपये द्यावे लागतात.
-जगभरातील सीनिक एक्लिप्स नावाच्या यॉटमध्ये 12 दिवसांचा स्टे. यामध्ये एक बटलर, 2 हेलिकॉप्टर आणि स्पाचा समावेश आहे.
-‘ड्रॉइंग डाउन द मून मॅचमेकिंग’ची एका वर्षाची मेंबरशीप, ज्याची किंमत 14 लाख 16 हजार 210 रुपये आहे. या एजन्सीमध्ये मॅचमेकिंग आणि डेटिंगसाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येते.
-मॅनहॅटनचे डॉक्टर कॉन्सांटिन वासजुकोविच यांच्याकडून कॉस्मॅटिक ट्रीटमेंट ज्याची किंमत 17 लाख 82 हजार आहे.
गिफ्ट बॉक्समध्ये असणाऱ्या ‘हटके’ गोष्टी
-2138 किंमतीचा एच फॅक्टर हायड्रोजन इनफ्यूज्ड पाण्याचा पाउच
-हॉट्सी टॉट्सी हॉस अॅमेथिस्ट बाथ बाँब, ज्याची किंमत 5439 रुपये आहे
-17 हजार 830 रुपयांचा मेडिटेशन हँडबँड
-मेडिकल यूरीन कलेक्शन सिस्टम
-सोन्याचा मुलामा देण्यात आलेलं पेन
-डे ब्रेकरची दोन तिकीटं, यामध्ये एका तासाच्या योगा आणि फिटनेस ट्रेनिंगनंतर दोन तास डान्स देखील करता येणार
-1961 रुपयांची सोमा स्मार्ट-फिट ब्रा
डिस्टिंक्टिव्ह एसेस्टस नावाच्या कंपनीकडून हे गिफ्ट बॉक्स देण्यात येतात. ग्रॅमी पुरस्कारांमध्येही याच कंपनीकडून गिफ्ट बॉक्सचं वितरण करण्यात येतं. या गिफ्ट बॉक्समध्ये देण्यात येणारे व्हाउचर किंवा इतर वस्तुंमध्ये आपल्या ब्रँडचाही समावेश व्हावा यासाठी अनेक कंपन्यामध्ये चढाओढ असते. साल 2002 पासून हे गिफ्ट बॉक्स देण्याची प्रथा सुरु करण्यात आली होती. त्यावेळी या बॉक्सची किंमत 20 हजार अमेरिकन डॉलर इतकी होती. 2016 पर्यंत या बॉक्सची किंमत 2 लाख 32 हजार डॉलर्सपर्यंत पोहोचली. वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्यासाठी Vacation Voucher देखील या बॉक्समधून देण्यात येतं. आतापर्यंत इस्रायल, जपान, लास वेगास यांसारख्या ठिकाणचे व्हाउचर देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सुट्टीदरम्यान खर्च करण्यासाठी 15 ते 20 हजार डॉलर इतकी रक्कम देखील या बॉक्समध्ये असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.