मुंबई, 10 फेब्रुवारी : दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या दोघांच्याही सोशल मीडियावर एकदम हटके पोस्ट असतात. दोघांच्या एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्सही रंजक असतात. त्यामुळे फॅन्सही त्यांच्या पोस्टबाबत नेहमी चर्चा करत असतात. मात्र सध्या या दोघांचेही फॅन्स काहीसे संभ्रमात आहेत. दीपिका आणि रणवीर नेमके कुठे गेले आहेत, असा प्रश्न ‘दीपवीर’च्या फॅन्सना पडला आहे. हा संभ्रम होण्याचं कारण आहेत दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले काही फोटो. गेल्या 3-4 दिवसांपासून दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही विचित्र पोस्ट केल्या आहेत. यामध्ये तिने एखादा सेल्फी किंवा हॉट फोटो अपलोड न करता काही वस्तूंचे फोटो पोस्ट केले आहेत.
दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या वस्तू तिच्या चाहत्यांना संभ्रमात टाकत आहेत. दीपिकाने आधी दोन पासपोर्टचा फोटो शेअर केला आणि या फोटोला तिने ‘His & hers #vacation’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनतर दीपिकाने कधी दोन छत्र्या तर कधी 2 चपलांचा फोटो शेअर केला आहे.
अगदी नुकताच तिने 2 सायकल्सचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या चाहत्यांकडून ती रणवीरसोबत सुट्टी एन्जॉय करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण तिच्या प्रत्येक फोटोला कॅप्शन देताना तिने ‘His & hers #vacation’ असं लिहीलं आहे.
नुकतच दीपिका पदुकोणचा 'छपाक' (Chhapaak) प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई देखील केली. रणवीर सिंहने सुद्धा त्याचा आगामी चित्रपट ‘जयेश भाई जोरदार’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यामुळे दोघजणं एकमेकांबरोबर वेळ घालवत आहेत.
दीपिकाने पोस्ट केलेल्या रहस्यमय फोटोंवरील कमेंट्स वाचल्यानंतर लक्षात येईल की फॅन्स त्यांच्या Vacation Picture ची किती वाट पाहत आहेत. आता हे एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन आहे की खरंच दीपवीर सुट्टी एन्जॉय करत आहेत, हे येत्या काही दिवसातंच समजेल.