जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुखला अबराहमने मारली किक, किंग खानची हालत झाली खराब! PHOTO VIRAL

शाहरुखला अबराहमने मारली किक, किंग खानची हालत झाली खराब! PHOTO VIRAL

शाहरुखला अबराहमने मारली किक, किंग खानची हालत झाली खराब! PHOTO VIRAL

अबराहमने तायक्वांडोमध्ये गोल़्ड मेडल मिळवल्याचे फोटो शहारुखानंने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान मोठ्या पडद्यावरील सिनेमांप्रमाणेच रिअल लाईफमध्येही तितकाच लोकप्रिय आणि लोकांच्या चर्चेत आहे. आपल्या करियरसोबतच आपल्या कुटुंबाची जबाबदारी तो न चुकता पार पडत असतो. अबराहमने तायक्वांडोमध्ये गोल़्ड मेडल मिळवल्याचे फोटो शाहारुखानंने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्याने आपला हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अबराहम हा शाहारुखचा सर्वात लहान मुलगा. त्याने याआधी रेसिंगमध्ये सुवर्णपदक आणि रौप्य पदक मिळवल्याचे फोटोही शहारुखने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते. कामाच्या व्यापातही आपल्या मुलांसोबत न विसरता वेळ घालवणं आणि त्याची काळजी घेऊन त्यांच्या सगळ्या स्पर्धांना उपस्थित राहाणं हे सगळं न विसरता शाहरुख खान कायम करत असतो. अबराहम खानचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या जिद्दीचं, बुद्धीचं कौतुक होत आहे.

जाहिरात

अबराहमने तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पहिल्यापासूनच अबराहम तायक्वांदोचं प्रशिक्षण घेत होता. सध्या त्याचं yello बेल्टमधील प्रशिक्षण सुरू आहे. किरण हे अबराहमचे कोच आहेत. तायक्वांदो स्पर्धेवेळी शहारुख खान उपस्थित होता. त्याने स्पर्धेनंतर मुलांसोबत संवादही साधला. proud of my son असंही उल्लेख शाहरुख खानने केला आहे. आपला हा आनंद त्याने युझर्ससोबत शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात