VIDEO : कतरिनासाठी दबंग खाननं गायलं रोमँटिक गाणं, पाहत राहिला विकी कौशल

VIDEO : कतरिनासाठी दबंग खाननं गायलं रोमँटिक गाणं, पाहत राहिला विकी कौशल

या व्हिडीओमध्ये सलमान-कतरिना यांच्या सोबत विकी कौशल सुद्धा आहे आणि सध्या कतरिना आणि विकी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं.

  • Share this:

मुंबई, 17 मे : सलमान खान आणि कतरिना कैफ ही प्रेक्षकांची आवडती जोडी मानली जाते. आता पर्यंत या दोघांनी अनेक सुपरहीट सिनेमा दिले आहे. याशिवाय काही वर्षांपूर्वी हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्या नात्याची त्यावेळी जोरदार चर्चा झाली होती. कालांतरानं त्यांचं ब्रेकअप झालं मात्र त्यांची मैत्री अद्याप कायम आहे. पण जेव्हाही या दोघांना कुठे एकत्र पाहिलं जातं त्यावेळी त्यांची चर्चा तर होतेच. असाच या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सलमान आणि कतरिना यांच्या सोबत विकी कौशल सुद्धा आहे. विशेष म्हणजे सध्या कतरिना आणि विकी रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा थ्रोबॅक व्हिडीओ कोणत्यातरी अवॉर्ड फंक्शनमधला आहे. ज्यात सलमान हातात माइक पकडून ऑडियन्समध्ये बसलेल्या कतरिनाच्या समोर जातो आणि तिच्यासाठी एक रोमँटिक गाणं गातो. इतर बॉलिवूड स्टारसोबत कतरिनाच्या बाजूला बसलेला विकी कौशल सुद्धा या दोघांकडे पाहत राहतो. एक अवॉर्ड फंक्शनमध्ये विकीनं कतरिनाची मस्करी करत तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. ज्यावर सलमाननं अजब प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर विकी आणि कतरिनाला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आणि त्यांच्या नात्याच्या सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

फ्लॉप सिनेमामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, खलनायकी भूमिकेनं चमकलं नशीब

View this post on Instagram

Sallu singing for Katrina 😍 Who all think they make beautiful jodi? ♥️

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

दरम्यान सलमान-कतरिनाचा हा व्हिडीओ फिल्मी ज्ञान या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून खूप व्हायरल सुद्धा होताना दिसत आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'राधे : युवर मोस्ट वॉन्टेड हिरो' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्याच्या लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये रविना टंडनचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर 'बिकिनी' PHOTO व्हायरल

कतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या भारत सिनेमात दिसली होती. त्यानंतर मार्चमध्ये तिचा सूर्यवंशी हा सिनेमा रिलीज होणार होता. ज्यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करत आहे. पण कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आलं. आता हा सिनेमा कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

लॉकडाऊनमध्ये बोअर झालायत तर हे हॉरर चित्रपट बघा, एकट्यानं पाहण्याचं धाडस नका करू

First published: May 17, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या