फ्लॉप सिनेमामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, खलनायकी भूमिकेनं चमकलं नशीब

फ्लॉप सिनेमामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, खलनायकी भूमिकेनं चमकलं नशीब

सध्या यशाच्या शिखरावर असणारी ही अभिनेत्री कधी काळी सतत फ्लॉप होणाऱ्या सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती.

  • Share this:

मुंबई, 17 मे : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा हिचं करिअर तर सध्या जोरावर आहे. तिचा करिअर ग्राफ वेगात वर चढत आहे. 2019 मध्ये रिलीज झालेला ड्रीम गर्ल हा तिचा सिनेमा सुपर हिट झाला. आज नुसरतचा वाढदिवस. सध्या यशाच्या शिखरावर असणारी नुसरत भरूचा कधी काळी सतत फ्लॉप होणाऱ्या सिनेमांमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. करिअरच्या सुरुवात नुसरतनं 'जय संतोषी माँ' या सिनेमातून केली होती. हा सिनेमा 2006 ला रिलीज झाला. त्यानंतर 2009 पर्यंत तिचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. 2009 मध्ये तिचा 'कल किसने देखा' रिलीज झाला. 2010 मध्ये 'ताज महल'. हे सर्वच सिनेमा फ्लॉप झाले.

नुसरतला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो 'लव्ह सेक्स और धोका' या सिनेमातून. हा सिनेमा सुद्धा नुसरतला नशीबानं मिळाला होता. ज्या अभिनेत्रीला या सिनेमासाठी फायनल करण्यात आलं होतं तिनं ऐनवेळी सिनेमाला नकार दिला. सिनेमाच्या शूटिंगला 10 दिवस बाकी होते ऑडिशन व्हिडीओ पुन्हा एकदा पाहण्यात आली आणि नशीबानं नुसरतची या सिनेमासाठी निवड झाली. या सिनेमामुळे तिचं नशीब फार बदललं असं नाही पण हा सिनेमा चांगला चालला. पण तिच्या प्यार का पंचनामा सिनेमानं तिचं नशीब पूर्णपणे पालटलं.

लॉकडाऊनमध्ये बोअर झालायत तर हे हॉरर चित्रपट बघा, एकट्यानं पाहण्याचं धाडस नका करू

प्यार का पंचनामा रिलीज होण्याआधी असं काही झालं होतं की नुसरत डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याआधी रिलीज झालेल्या आकाशवाणी या सिनेमासाठी तिनं खूप मेहनत घेतली होती. पण हा सिनेमा फ्लॉप झाला. नुसरत दिल्लीला परत आल्यावर तिचे फ्रेंड्स तिला हा सिनेमा पाहायला गेले होते. सर्वांसोबत नुसरत सिनेमा पाहायला गेली तेव्हा थिएटरमध्ये जास्त लोक नव्हते. दिल्लीतल्या एकाच थिएटरमध्ये हा सिनेमा लागला होता आणि थिएटरमध्ये नुसरतला कोणीच ओळखलं नाही. तिच्या मागे काही मुलं बसली होती. जे तिच्या प्रत्येक सीनची खिल्ली उडवत होते. हे सर्व सिनेमा संपेपर्यंत सुरू राहिलं ज्यामुळे नुसरत खूप दुःखी झाली.

लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमुळे अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूनंतर लोकांनी मदत नाकारली

नुसरतच्या फ्रेंड्सचे पालक सुद्धा तिला समजावत राहिले की तिनं सध्या शांत राहावं. या घटनेमुळे नुसरत डिप्रेशनमध्ये गेली होती. बराच काळ ती या धक्क्यातून सावरली नव्हती. नुसरतनं सांगितलं की, तिच्या आई-वडिलांनाही माहित होतं की ती डिप्रेशनमध्ये आहे. ते तिला सतत समजावत राहिले. पण ती यातून बाहेर पडली. ती काम करत राहिली आणि तिला त्याच भूमिकांनी तिला ओळख मिळवून दिली ज्या सुरुवातीला निगेटव्ह असल्याचं मानलं गेलं होतं. त्यानंतर 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टीटू की स्वीटी' हे तिचे सिनेमा रिलीज झाले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले.

प्रियांकाने केसांचं हे नेमकं काय केलंय? डान्सचा VIDEO पाहून चाहत्यांचा सवाल

First published: May 17, 2020, 9:09 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या