मुंबई, 5 जून : बॉलिवूड अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार याकडे त्याच्या सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सलमानची आतापर्यंतची अशी एकही मुलाखत नसेल ज्यात त्याला त्याच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारला जात नाही. चाहते, मीडिया, लहान असो वा मोठे सर्वांनाच सलमानच्या लग्नाविषयी प्रचंड उत्सुकता असलेली नेहमीच दिसून येते. पण प्रत्येकवेळी सलमान हा प्रश्न मस्करीच्या अंदाजामध्ये घेत त्याचं उत्तर देणं टाळताना दिसतो. पण यावेळी मात्र असं अजिबात झालं नाही. त्याचा आगामी सिनेमा ‘भारत’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमानला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आला आणि सलमाननंही मनात काही न ठेवता या प्रश्नाचं उत्तर दिलं पण त्याच्या या उत्तरानं असंख्य चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे. (इफ्तार पार्टीमुळे चर्चेत असलेल्या बाबा सिद्दीकीला दाऊद दिली होती ‘ही’ धमकी) नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, ‘सलमानला तु लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, आता मला लग्नावर विश्वास नाही राहीला. लग्नाची परंपरा आता संपत चालली आहे. सध्या लग्न ही संकल्पानाच लोकांच्या आयुष्यातून कमी कमी होत चालली आहे.
सलमानच्या मते, लग्नापेक्षा मैत्री जास्त चांगली असते. ज्यावर तो विश्वास करतो. सलमानला मुलांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यानं म्हटलं, या सर्व गोष्टी ज्यावेळी व्हायच्या असतील तेव्हा होतील. काही दिवसांपूर्वी सलमान सरोगसीद्वारे बाबा होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र यावर स्वतः सलमाननं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत समानचे वडील सलीम खान यांनी सलमाननं अद्याप लग्न का केलं नाही यांचा खुलासा केला. सलमाननं लग्न न करण्याचं कारण सांगितलं नसलं तरी त्याच्या वडीलांनी मात्र सलमानच्या लग्नाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. (अचानक का चर्चेत आलाय आमिर खानच्या लेकीचा बेली स्टड आणि टॅटू)
काही दिवसांपूर्वी एक मुलाखीतीत सलमानविषयी बोलताना सलीम खान म्हणाले, ‘सलमान जेव्हा एखाद्या मुलीला डेट करायला सुरुवात करतो त्यावेळी सुरुवातीला सर्वकाही खूप छान असतं. पण मग ज्यावेळी सलमान त्या मुलीमध्ये आपल्या आईच्या सवयी शोधायला सुरुवात करतो तिथून सर्व बिघडायला सुरुवात होते.’ सलमान त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळचा आहे. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतही त्याच्या मित्रमंडळीसोबतच त्याचे आई-बाबाही उपस्थित असतात. सलमानचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे आणि तो जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबातील व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करतो. सलमानला लहान मुलं खूप आवडतात. तो अनेकदा आपला भाचा आहिल सोबत वेळ घालवताना दिसतो. (Miss u मिस्टर- लग्नानंतरही जेव्हा मृण्मयी देशपांडेला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये रहावं लागलं)
सलमान खानचा बहुचर्चित भारत सिनेमा आज ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमानच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. म्हणूनच सिनेमाच्या अडवान्स बुकिंगसाठीही त्याचे चाहते वेडे झाले आहेत. हैदराबादमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त शो आधीच बुक झाले आहेत.
SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीला किती खर्च झाला तुम्हाला माहिती आहे का?