Miss u मिस्टर- लग्नानंतरही जेव्हा मृण्मयी देशपांडेला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये रहावं लागलं

Miss u मिस्टर- लग्नानंतरही जेव्हा मृण्मयी देशपांडेला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये रहावं लागलं

दोघे नवं विवाहित जोडपं असून वरुणला कामानिमित्ताने काही दिवसांत लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप'.

  • Share this:

मुंबई, 04 जून- मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर तगडे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं असून वरुणला कामानिमित्ताने काही दिवसांत लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप'. यादरम्यान दोघांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण यातून ते मार्ग काढतात की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. हा संपूर्ण सिनेमा 'लाँग डिस्टन्स रिलेशनशिप' वर भाष्य करणारा आहे.

Video- सर्वांसमोर अरबाजच्या गर्लफ्रेंडला अर्पिता म्हणाली, ‘ओढणी नीट कर...’

‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर आज प्रकाशित झालेल्या ट्रेलरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करिअरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

तर सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”

अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.

VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

या चित्रपटातील गीत वैभव जोशी यांनी लिहिली असून दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या