मुंबई, 04 जून : बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या स्टार किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा आहे. पण या सगळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खान मात्र एका वेगळ्या कारणानंच चर्चेत आली आहे. सध्या सारा आणि अनन्या पांडेला सोडून लोकांच्या नजरा चक्क इराकडे वळल्या आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इराच्या सोशल मीडिया पोस्ट. मागच्या काही काळापासून इराच्या सोशल मीडिया पोस्टनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे इराची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोमध्ये इराच्या तिच्या हातावरील एक खास टॅटू दिसत आहे. इरानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये टॅटूसोबत तिच्या बेंबीवर दिसणारा स्टड सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये इरानं एक क्रॉप टॉप घातला असून यातून तिच्या बेंबीवरील स्टड दिसत आहे. याशिवाय या फोटोमधील इराचा टॅटू सुद्धा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये ‘if we won’t, then who will’ असं लिहिलं आहे. याचा अर्थ ‘जर आपण नाही केलं तर मग कोण करणार.’ ही एक प्रसिद्ध संतांची म्हण आहे. ज्याचा अर्थ जर देव नाही तर मग कोण तुमची मदत करणार. पण इराच्या या टॅटू पेक्षा तिच्या स्टडची चर्चाच जास्त होत आहे. Super 30 : हृतिकनं साकारलाय सायकलवरून पापड विकणारा ‘हा’ शिक्षक
इरानं शेअर केलेल्या या फोटोवरून आणि विशेषतः तिच्या स्टड वरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. मात्र इरा एक स्वतंत्र विचारांची आणि बिनधास्त मुलगी असल्यानं तिला या गोष्टींचा काहीही फरक पडला नाही. या आधीही अनेकदा इराला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं पण या सर्वांना कसं दुर्लक्ष करायचं हे तिला चांगल्या प्रकारे माहित आहे. काही वेळा इराला तिच्या वडीलांबाबत उलट सुलट लिहून तिला ट्रोल करण्यात येत मात्र इरा याकडे फारसा लक्ष देत नाही. ‘या’ पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट
Video- सर्वांसमोर अरबाजच्या गर्लफ्रेंडला अर्पिता म्हणाली, ‘ओढणी नीट कर…’