इफ्तार पार्टीमुळे चर्चेत असलेल्या बाबा सिद्दीकीला दाऊद दिली होती ‘ही’ धमकी

इफ्तार पार्टीमुळे चर्चेत असलेल्या बाबा सिद्दीकीला दाऊद दिली होती ‘ही’ धमकी

मुंबईमधील प्रसिद्ध राजकीय व्यक्तींमध्ये बाबा सिद्दीकींचं नाव घेतलं जातं.

  • Share this:

मुंबई, 04 जून : बॉलिवूडकरांमध्ये प्रसिद्ध असलेली बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी नुकतीच पार पाडली. यामध्ये बॉलिवूडमधील जवळ जवळ सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. याशिवाय सलमान आणि शाहरुखशी असलेल्या मैत्रीसाठी सुद्धा बाबा सिद्दीकी ओळखले जातात. खरं तर बाबा सिद्दीकी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नाहीत. मुंबईमधील प्रसिद्ध राजकीय व्यक्तींमध्ये बाबा सिद्दीकींचं नाव घेतलं जातं. पण बॉलिवूडबद्दल त्यांना विशेष आकर्षण असल्यानं त्यांच्या घरी दरवर्षी त्यांच्या खास मित्रमंडळींसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं आणि यासाठी सर्व बॉलिवूडकरांना निमंत्रण असतं. पण इफ्तार पार्टीमुळे प्रसिद्ध असणारे बाबा सिद्दीकी काही वर्षांपूर्वी डॉन दाऊद इब्राहिमनं दिलेल्या धमकीमुळे प्रचंड चर्चेत आले होते.

बाबा सिद्दीकी मुंबईतील काँग्रेसचे नेता आहे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वांद्रे पश्चिम मतदार संघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आले आहेत. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या नावाची खूप चर्चा झाली ती अंडरवर्ल्ड डॉननं सिद्दीकी यांना धमकी दिल्यानं. हे प्रकरण दाऊदची जवळची व्यक्ती अहमद लंगडा याच्याशी संबंधीत होतं.

अचानक का चर्चेत आलाय आमिर खानच्या लेकीचा ‘तो’ टॅटू

मुंबईतील एका जमीनीच्या संदर्भात बाबा सिद्दीकी आणि अहमद लंगडा यांच्यात वाद होता. या प्रकरणात 2013मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं बाबा सिद्दीकी यांना फोन करून, रामगोपाल वर्माला सांगून ‘एक था एमएलए’ असा  तुझा सिनेमा बनवेन अशी धमकी दिली होती. पण जेव्हा हे प्रकरण समोर आलं त्यावेळी मीडियामध्ये यावरून प्रचंड वाद झाले. अद्यापही बॉलिवूडकरांचे दाऊदशी संबंध आहेत की काय अशा प्रकारच्या चर्चा त्यावेळी सुरू झाल्या होत्या. याशिवाय 2017मध्ये मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात ईडीनं त्यांच्या घरावर छापे टाकल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आले होते.

Super 30 : हृतिकनं साकारलाय सायकलवरून पापड विकणारा 'हा' शिक्षक

बाबा सिद्दीकी दरवर्षी  रमजान महिन्यात आपल्या सर्व मित्रांना पार्टी देतो. यंदाच्या पार्टीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, कैटरीना कैफ, रवीना टंडन, उर्मिला मातोंडकर, मौनी रॉय, अपारशक्ति खुराना, अर्चना लोखंडे आणि सोनू सूद आदी बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

‘दयाबेन’ने शेअर केला आपल्या मुलीचा फोटो, चाहते म्हणाले, ‘वाह’

First published: June 4, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या