• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘हम दिल दे चुके सनम’ला 22 वर्षे पूर्ण; सलमानला आली ऐश्वर्यासोबतच्या खास क्षणांची आठवण

‘हम दिल दे चुके सनम’ला 22 वर्षे पूर्ण; सलमानला आली ऐश्वर्यासोबतच्या खास क्षणांची आठवण

सलमान खानने शेअर केल्या 'हम दिल दे चुके सनम'च्या आठवणी. ऐश्वर्या रायसोबत हीट ठरली होती केमिस्ट्री.

 • Share this:
  मुंबई 18 जून : बॉलिवूडच्या काही आयकॉनिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali) ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam). तब्बल 22  वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाची आजही क्रेझ पाहायला मिळते. याशिवाय सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची केमिस्ट्री आणि अजय देवगनचा (Ajay Devgn) अभिनय याने चित्रपटाला चार चाँद लागले होते. तर प्रंचड लोकप्रियता चित्रपटाने मिळवली होती. चित्रपटाला आता 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सलमानला जुन्या आठवणी येत आहेत.

  सलमान खान पहिल्यांदाच करतोय बायोपिक; साकारणार ‘या’ रिअल लाईफ हिरोची भूमिका

  त्याने सोशल मीडियावर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत ‘हम दिल दे चुके सनम’च्या आठवणींना उजाळा दिला आहे. भन्साळींसोबतचा जुना फोटो त्याने पोस्ट केला आहे. त्याने लिहीलं आहे ‘बावीस वर्षे झाले हम दिले दे चुके सनम ला.’ तर त्याने अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी यांना टॅग ही केलं आहे.
  संजय लीला भन्साळी यांच्या नजरेतली प्रेमकहानी म्हणजेच हीट समीकरण बनलं आहे. ते त्यावेळी पाहायला मिळालं होतं. अधुरी प्रेमकहानी चित्रपटात रेखाटण्यात आली होती. सलमानचा सुपरहीट चित्रपट त्यावेळी ठरला होता. याशिवाय चित्रपटातील गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
  ‘हम दिल दे चुके सनम’ हे गाणं आजही तरुणाईच्या ओठांवर गुणगुणलेलं पाहायला मिळतं. ऐश्वर्याने केलेलं नृत्यही उत्कृष्ट होतं.
  View this post on Instagram

  A post shared by jessica♡ (@bollyshona)

  सलमान – ऐश्वर्याच्या केमिस्ट्रीने तर चित्रपटात प्राण आणले होते. त्यावेळी 16 कोटींचं बजेट असणाऱ्या चित्रपटाने तब्बल 52 कोटी रुपायंचा गल्ला बॉक्सऑफिसवर कमावला होता.
  मुख्य कास्ट सोडून इतरही मात्तब्बर कलाकार चित्रपटात होते. ज्यात जोहरा सेहगल, विक्रम गोखले, स्मिता जयकर, हेलन यांचा समावेश होता. आजही अनेक प्रेक्षक हा चित्रपट आवर्जून पाहताना दिसतात. यानंतर सलमान – ऐश्वर्याच्या जोडीला खूपच पसंत केलं जात होतं. तर भन्साळी यांनी या जोडीसाठी आणखी एका चित्रपटांचही लेखण केलं होतं. मात्र ते कधीही शक्य झालं नाही.
  Published by:News Digital
  First published: