जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खान पहिल्यांदाच करतोय बायोपिक; साकारणार ‘या’ रिअल लाईफ हिरोची भूमिका

सलमान खान पहिल्यांदाच करतोय बायोपिक; साकारणार ‘या’ रिअल लाईफ हिरोची भूमिका

सलमान खान पहिल्यांदाच करतोय बायोपिक; साकारणार ‘या’ रिअल लाईफ हिरोची भूमिका

सलमानने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणत्यातरी आत्मचरित्रावर आधारीत म्हणजेच बायोपिकमध्ये (Biopic) काम करण्याचं ठरवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 जून : अभिनेता सलमान खान (Salman Khan)  सातत्याने अॅक्शन चित्रपटांत दिसत आहे. पण आता त्याने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच कोणत्यातरी आत्मचरित्रावर आधारीत म्हणजेच बायोपिकमध्ये (Biopic) काम करण्याचं ठरवलं आहे. सलमान खान म्हणजेच बॉलिवूडचा भाईजान मानला जातो. त्याच्या चित्रपटांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहिली जाते. कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, रोमॅन्टीक असे सर्वच चित्रपट सलमानने आजवर केले आहेत. तर आता तो बायोपिकमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्तांच्या चित्रपटात सलमान झळकणार आहे. ‘ब्लॅक टायगर’ ( Black Tiger)  असं या चित्रपटाचं नाव असून प्रसिद्ध भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक (Ravindra Kaushik) यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे.

‘तारक मेहता…’च्या गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक माहीत आहे का? सेट नाही तर खरं खुरं दुकान आहे

रवींद्र कौशिक यांना आजवरचा सर्वात चांगला गुप्तहेर (Detective) मानलं जातं. त्यांना ब्लॅक टायगर म्हणून ओळखलं जायचं. राजकुमार गुप्ता मागील पाच वर्षांपासून त्यांच्या जीवनावर संशोधन करत आहे. आणि त्यांनी एक स्क्रिप्टही तयार केलं आहे. त्यांना आता ते मोठ्या पडद्यावर उतरवायचं आहे.

जाहिरात

राजकुमार यांनी सलमानला हे स्क्रिप्टही ऐकवलं आहे. तर त्यालाही ते आवडलं असून त्याने लगेच चित्रपटासाठी होकारही दिला आहे. सलमान सध्या साजीद नादियावालाच्या एका चित्रपटात काम करत आहे. तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो राजकुमार यांच्या ब्लॅक टायगरवर लक्ष देणार आहे. सलमानचा ‘एक था टायगर’  चित्रपट आला होता तेव्हा तो रवींद्र कौशिक यांच्या जीवनावरीलचं आहे असं प्रेक्षकांना वाटलं होतं. पण तो हा चित्रपट नव्हता. तर आता तो बायोपिक साकारला जाणार आहे. याशिवाय सलमानच्या हातात आणखी बरेच चित्रपट आहेत. ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘टायगर 3’, अंतिम तर ‘पठान’मध्ये कॅमियो करणार आहे.  याशिवाय एका साउथ चित्रपटाच्या रिमेक वरही त्यांचं काम चालू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात