मुंबई, 30 सप्टेंबर : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त असणारा रिअलिटी शो बिग बॉस 13 चा प्रीमियर खूपच ग्रँड अंदाजात पार पडला. खरं तर सलमान खान स्टेजवर कोणत्याच स्पर्धकाला फटकारायला थोडाही उशीर करत नाही मात्र बिग बॉसच्या प्रीमियरमध्ये सलमानकडून एक अजब चूक झाली. बिग बॉस 13च्या एका स्पर्धकाला बोलवताना सलमानला अचानक कतरिनाची आठवण आली. बिग बॉसचा 13 वा सीझन सेलिब्रेटी स्पेशल आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत. कालच्या प्रीमियरमध्ये स्पर्धकांची धमाकेदार एंट्री झाली असून हे सर्वच स्पर्धक या शोमध्ये येण्याआधीपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. या स्पर्धकांची एंट्री होत असताना जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्राचा नंबर आला त्यावेळी तिला बोलवताना सलमान ‘क’ असं बोलून अचानक थांबला आणि हसू लागला. एवढंच नाही तर तो स्वतःच म्हणाला आता माझ्या तोंडून कतरिनाचं नाव निघणार होतं. यानंतर आपल्याच वाक्यावर तो लाजतानाही दिसला. Viju Khote Death : सरदाराचं ‘नमक’ खाण्यासाठी कालियाला मिळाले होते एवढे पैसे
सलमान आणि कतरिनाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. ‘टायगर जिंदा है’ आणि ‘भारत’ सारखे सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर सलमान कतरिना जास्तच सपोर्ट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफा अवॉर्डमधील कतरिनाच्या परफॉर्मन्सच्या आधी तो जोरात तिच्या नावानं ओरडताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि त्यानंतर सलमान आजही कतरिनाच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?
बिग बॉसच्या 13 व्या सीझन बद्दल बोलायचं तर पहिल्या दिवसापासूनच हा शो खूपच मजेदार असणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. यावेळी या शोमधील स्पर्धक म्हणून असीम रियाज, पारस छाब्रा, सिद्धार्थ शुक्ला, अबु मलिक, सिद्धार्थ डे,माहिरा शर्मा, रश्मि देसाई, देवोलीना भाट्टाचार्य, शेफाली बग्गा, शेहनाज गिल, आरती सिंह, दलजीत कौर आणि कोइना मित्रा यांनी एंट्री केली आहे. कंगनाच्या SEXUAL पार्टनरबद्दल समजल्यावर काय होती पालकांची प्रतिक्रिया ===================================================================== VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड