Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?

कलर्स टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो बिग बॉसच्या 13 व्या पर्वाला कालपासून (29 सप्टेंबर) सुरवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 11:41 AM IST

Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?

मुंबई, 30 सप्टेंबर : कलर्स टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो बिग बॉसच्या 13 व्या पर्वाला कालपासून (29 सप्टेंबर) सुरवात झाली आहे. आता या शोमधील स्पर्धकांची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं बिग  बॉसच्या घरात एंट्री घतली आहे. याशिवाय सिद्धार्थ डे, पारस छाब्रा, अबु मलिक आणि आसिम रियाज यांनी सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. तसेच अभिनेत्री माहिरा शर्मा सुद्धा 13 व्या सीझनसाठी बिग बॉसच्या घरात पोहोचली आहे.

सिद्धार्थ शुक्ला

सिद्धार्थ शुक्लानं सेक्सी बॉय या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स करत बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. सिद्धा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं 'बालिका वधू', 'दिल से दिल तक'सह इतर अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

10 वर्षांच्या मुलाचं ढोलकीवर रॅप साँग, व्हिडीओ पाहून हनी सिंगही झाला हैराण

Loading...

सिद्धार्थ डे 

तर सिद्धार्थ डेनं सुद्धा बिग बॉसच्या घरात अगदी धडाक्यात एंट्री केली. सिद्धार्थ व्यवसायानं लेखक असून तो सलमानचे दबंग डायलॉग्स लिहित आला आहे. बिग बॉसमध्ये येण्याचं कारण फक्त सलमान असल्याचं सिद्धार्थनं सांगितलं. त्यानं हिमेश रेशमियासह सलमानच्याही सिनेमांच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत.

पारस छाब्रा

टीव्ही अभिनेता पारस छाब्रानं बिग बॉसच्या घरात धमाकेदार एंट्री घेतली आहे. पारसनं  रिअलिटी शो व्यतिरिक्त काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. पण त्याच्या करिअरपेक्षा त्याच्या अफेअर्समुळे तो जास्त चर्चेत राहिला. मूळचा दिल्लीचा असलेला पारस स्प्लिट्सव्हिला 5चा विजेता आहे. याशिवाय तो आणि अभिनेत्री सारा अली खान बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते.

शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज

अबु मलिक

बॉलिवूडचे म्यूझिक कंपोझर आमि रायटर अबु मलिक सुद्धा 13 व्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत. प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचे भाऊ अबु मलिक स्वतः एक गायक आणि संगीतकार आहेत.

आसिम रियाज

मॉडेल असिम रियाज सुद्धा बिग बॉस13 च्या स्पर्धकांच्या लिस्टमध्ये आहे. आसिम रियाजनं शर्टलेस डान्स करत बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःचं वगळं स्थान निर्माण करणारा आसिम मूळचा जम्मू काश्मीरचा आहे. आसिम त्याच्या फिटनेसमुळे सर्वाधिक चर्चेत असतो.

माहिरा शर्मा

अभिनेत्री माहिरा शर्मानं सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. तिनं याआधी पॉपुलर शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा', 'पार्टनर्स ट्रबल हो गई डबल', 'नागिन 3' या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

देवोलिना भट्टाचार्य

टीव्हीची संस्कारी गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टचार्य ही सुद्धा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. देवोलिनानं  'साथ निभाना साथिया' या टीव्ही शोमध्ये काम केलं असून या शोमधील गोप बहूच्या भूमिकेनं तिला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली.

रश्मी देसाई

टीव्ही अभिनेत्रीनं बिग बॉसच्या घरात येण्यासाठी सर्वाधिक मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. ती या शोची सर्वात महागडी स्पर्धक आहे.

शेफाली बग्गा

न्यूज अँकर शेफाली बग्गानं बिग बॉस 13 मध्ये एंट्री करणार आहे. शेफाली फक्त टीव्हीवरच नाही तर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. एक न्यूज अँकर बिग बॉसच्या घरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शहनाज गिल

पंजाब एंटरटेनमेण्ट इंडस्ट्रीची मॉडेल आणि अभिनेत्री शहनाज गिल सुद्धा बिग बॉसच्या घरात पोहचणार आहे. शहानाज ला खरी ओळख 'मझे दी जट्टी' या गाण्यातून मिळाली होती याशिवाय 2015 मध्ये शिव दी किताब या म्युझिक व्हिडीओमध्ये शहनाज दिसली होती.

दलजीत कौर

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर सुद्धा 13 व्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. डान्स रिअलिटी शो नच बलिएच्या 4थ्या सीझनमध्येही तिनं सहभाग घेतला होता आणि ती या शोची विनर सुद्धा झाली होती. याशिवाय 'इस प्यार को क्या नाम दूँ' या सिरिअलमध्येही तिनं काम केलं आहे.

कोएना मित्रा

अभिनेत्री कोएना मित्रा (koena mitra) सुद्धा बिग बॉस 13 मध्ये दिसणार आहे.

आरती सिंह

बिग बॉस 13मध्ये बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंहनं एंट्री घेतली आहे. ती प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णाची बहिण आहे आणि कृष्णासोबतच ती बिग बॉसच्या घरात पोहोचली.

या सर्वांशिवाय अभिनेत्री अमिषा पटेल सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. तिची या घरात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तर मागच्या सीझनप्रमाणे यावेळी सलमान खान हा सीझन होस्ट करताना दिसणार आहे.

The Fast and the Furious च्या दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

=============================================================

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 11:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...