मुंबई, 30 सप्टेंबर : 'शोले' चित्रपटातील 'कालिया' ही व्यक्तीरेखा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील गायदेवी येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरलेल्या शोले चित्रपटातील 'सरदार, मैंने आपका नमक खाया है'; या संवादामुळे विजू खोटे यांना वेगळी ओळख मिळाली होती. विजू खोटे यांनी हिंदी आणि मराठी भाषेतील 300हून अधिक चित्रपटात काम केले होते. विजू यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी विनोदी अभिनेता हरपला अशी भावना चित्रपट क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
हिंदीसोबतच विजू खोटे यांनी मराठी सिनेमातही आपली वेगळी छाप पाडली होती. मराठीमधील अशी ही 'बनवाबनवी', 'आयत्या बिळावर नागोबा', 'या मालक' या चित्रपटांमधील त्यांची भूमिका गाजली होती. 1964मध्ये रिलीज झालेल्या 'या मालक' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हा सिनेमा त्यांचे वडील नंदू खोटे यांनी प्रोड्यूस केला होता. हा एक सायलेंट कॉमेडी ड्रामा होता.
कंगनाच्या SEXUAL पार्टनरबद्दल समजल्यावर काय होती पालकांची प्रतिक्रिया
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी विजू त्यांची प्रिटिंग प्रेस चालवत असत. शोले चित्रपटातील 'सरदार, मैंने आपका नमक खाया है' हा त्यांचा संवाद विशेष गाजला होता. या सिनेमात कालियाची भूमिका साकरणाऱ्या विजू यांना सिनेमासाठी 2500 रुपये एवढं मानधन मिळलं होतं. त्यांनी या सिनेमात गब्बर सिंहच्या विश्वासू सहकाऱ्याची भूमिका साकारली होती.
Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?
'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' ही व्यक्तीरेखा देखील विजू यांनी लोकप्रिय केली होती. त्यातील त्यांची 'गलती से मिस्टेक हो गया' हा डायलॉग आज देखील अनेकांच्या तोडी ऐकायला मिळतो. मराठी हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक वर्षे नाटकांमध्ये देखील काम केले होते. छोट्या पडद्यावरील मालिकेत विजू यांनी आपल्या अभिनयाची छाप टाकली होती. 'जबान संभाल के' या मालिकेतील त्यांनी साकारलेली व्यक्तीरेखा रसिकांच्या स्मरणात आहे.
10 वर्षांच्या मुलाचं ढोलकीवर रॅप साँग, व्हिडीओ पाहून हनी सिंगही झाला हैराण
शाहरुखची लेक करतेय हॉलिवूडमध्ये एंट्री, पहिल्या सिनेमाचा Teaser रिलीज
==============================================================
VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा