सलमान की अजय कोण मारणार बाजी? एकाच दिवशी होणार 3 चित्रपटांचा धमाका

सलमान की अजय कोण मारणार बाजी? एकाच दिवशी होणार 3 चित्रपटांचा धमाका

Jr NTR, सलमान खान याशिवाय अभिनेता अजय देवगनचा (Ajay Devgn) ‘मे डे’ (May Day) हा चित्रपट देखिल याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ट्रिपल धमाका दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चित्रपटांच प्रदर्शन रखडलं असलं तरीही अनेक चित्रपटांचं शुटींग सुरू आहे व पुढच्या वर्षी ते चित्रपटगृहांत प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज होत आहेत. नुकतीच अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) टायगर 3 (Tiger 3)  ची बातमी समोर आली होती. चित्रपटाचं शुटींग आता शेवटच्या टप्प्यात आलं असून उर्वरीत चित्रिकरण हे रशिया मध्ये होणार आहे. तर पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यासोबतच आणखी दोन चित्रपटांची एकाच दिवशी टक्कर होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Jr NTR च्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे व हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तर 29 एप्रिल 2022 ला चित्रपट चित्रपटगृहात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड हंगामा (Bollywood Hungama) या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट सलमान खानचा टायगर 3 या चित्रपटाशी क्लॅश (movies clashes) होणार आहे.

'या गाण्यात संगीत नाही'; गायक शानने हनी सिंगची नाव न घेता उडवली खिल्ली

सलमान खानच्या टायगर 3 च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही सलमान दरवर्षी ईद ला नवा चित्रपट घेऊन येतो. त्यामुळे या चित्रपटांची टक्कर होण्याची शक्यता आहे. याशिवाय अभिनेता अजय देवगनचा (Ajay Devgn) ‘मे डे’ (May Day)  हा चित्रपट देखिल याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ट्रिपल धमाका दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या उत्तरामुळं लारा दत्ता होती ‘मिस युनिव्हर्स’; उत्तर ऐकून परीक्षकही पडले सुन्न

काही दिवसांपूर्वी अजय देवगन ने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली होती. त्यानुसार चित्रपट 29 एप्रिल 2022 ला चित्रपटगृहांत दिसणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रेक्षकांना एकाच वेळी मोठी ट्रिट मिळणार असली तरीही प्रेक्षक वर्ग विभागला जाणार आहे. साउथ प्रेक्षका हा Jr NTR30 चित्रपटाकडे वळला जाईल तर अजय आणि सलमानचा ही एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर याचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे.

Published by: News Digital
First published: April 16, 2021, 3:48 PM IST

ताज्या बातम्या