मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /200 Trailer: 'जाती के बारे मे क्यो नं बोलू सर...' संघर्षाच्या या कहाणीत दमदार भूमिका साकारणार रिंकू राजगुरू

200 Trailer: 'जाती के बारे मे क्यो नं बोलू सर...' संघर्षाच्या या कहाणीत दमदार भूमिका साकारणार रिंकू राजगुरू

दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मुंबई 6 ऑगस्ट :  सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू  (Rinku Rajguru) लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘200’ या तिच्या आगामी ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT) वरील चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मागील वर्षी रिंकू 100 या सीरिज मध्ये दिसली होती तर आता तिचा 200 हा चित्रपट येत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दलित महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढा दाखवण्यात आला आहे. रिंकू अनेक महिलांसोबत हा लढा लढत आहे अशी एकंदरीत चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे रिंकुच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेकांनी तिला शुभेच्छा ही दिल्या आहेत. ट्रेलर मधून रींकुची दमदार भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे.

'राज कुंद्राप्रकरणी खरं बोलल्याची मिळतेय शिक्षा'; गहना वशिष्ठचा पुन्हा पोलिसांवर आरोप

‘200 हल्ला हो’ (200 Halla Ho) हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत असणार आहे. याशिवाय चित्रपटात मातब्बर कलाकारही  आहेत. चित्रपटात रिंकू राजगुरुसह अमोल पालेकर (Amol Palekar) आणि आणि प्रसिद्ध अभिनेता बरुण सोबती (Barun Sobati) देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. झी 5चा (Zee5) हा चित्रपट आहे.

फारच सुंदर आहे भुवनेश्वर कुमारची पत्नी; पतीचं Facebook Acc ही केलं होतं हॅक

रिंकू चा दुसरा हिंदी प्रोजेक्ट आहे. या आधी ती 100 मध्ये दिसली होती.  20 ऑगस्टला झी5 (Zee5) वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रिंकू कडे एक मराठी चित्रपटही आहे. शिवाय ती नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ (Jhund) या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. त्यात ती अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Rinku rajguru, Sairat