मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'राज कुंद्राप्रकरणी खरं बोलल्याची मिळतेय शिक्षा'; गहना वशिष्ठचा पुन्हा पोलिसांवर आरोप

'राज कुंद्राप्रकरणी खरं बोलल्याची मिळतेय शिक्षा'; गहना वशिष्ठचा पुन्हा पोलिसांवर आरोप

मॉडेलने केलेल्या आरोपांनतर गहनाचं म्हणणं आहे की तिने राजचं समर्थन केलं म्हणून तिला अडकवलं जात आहे.

मॉडेलने केलेल्या आरोपांनतर गहनाचं म्हणणं आहे की तिने राजचं समर्थन केलं म्हणून तिला अडकवलं जात आहे.

मॉडेलने केलेल्या आरोपांनतर गहनाचं म्हणणं आहे की तिने राजचं समर्थन केलं म्हणून तिला अडकवलं जात आहे.

मुंबई 6 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty)  पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रफिती प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबई क्राइम ब्रँचने दावा केला आहे की त्यांच्याकडे राज विरेधात सबळ पुरावेही आहेत. दरम्यान पोलिस या प्रकरणात कसून चौकशी करत आहेत. या संदर्भात अनेकांची नावंही समोर येत आहेत. तर अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vashishth) सुरुवातीपासूनच या प्रकरणात आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पोलिसांवर गंभीर आरोप लावले होते.

दरम्यान या प्रकरणात चार निर्मात्यांवर एक मॉडेलने बलात्काराचे आरोप लावले होते. यात गहना वशिष्ठचंही नाव सामील आहे. पण तिने हे सगळे आरेप खोटे असल्याचंही म्हटलं आहे. तसेच तिला या प्रकरणात ओढलं जात आहे असंही तिचं म्हणणं आहे. गहना सध्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहे. फेब्रूवारी महिन्यात तिला अटक झाली होती. त्यानंतर तब्बल 5 महिने ती तुरुंगात होती.

..आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी धर्मेंद्र यांच्या घरासमोर उभी केली गाडी; पाहा काय घडलं होतं

मॉडेलने केलेल्या आरोपांनतर गहनाचं म्हणणं आहे की तिने राजचं समर्थन केलं म्हणून तिला अडकवलं जात आहे. व तिला खरं बोलण्याची शिक्षा मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार गहनाने म्हटलं आहे की, “मला 4 फेब्रूवारीला  अटक करण्यात आली. माझा लॅपटॉप, मोबाईल सगळं पोलिसांनी जप्त केलं. त्यात त्या मुलीचं चॅट देखील आहे, ज्यात ती मला धन्यवाद करत आहे. ती काम दिल्याबद्दल मला धन्यवाद म्हणत आहे. तिने माझ्याकडून पैसे देखील मागितले होते, पण मी तिला पैसे देण्यास मकार दिला कारण मला तिच्यावर संशय होता.”

दरम्यान याआधी गहनाने दावा केला होता की, पोर्न रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा आणि एकता कपूरचं (Ekta Kapoor) नाव घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दबाव टाकला होता. इतकच नाही तर त्यांनी 15 लाखांची मागणी केली होती. असाही आरोप तिने केला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty