• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पतीच्या निधनाची बातमी कळताच सायरा बानोंनी उच्चारला 'हा' शब्द; म्हणाल्या...

पतीच्या निधनाची बातमी कळताच सायरा बानोंनी उच्चारला 'हा' शब्द; म्हणाल्या...

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांचे होते असे हावभाव; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

 • Share this:
  मुंबई 8 जुलै: हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीप कुमार (Actor Dilip Kumar) यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार हे अभिनयाचं विद्यापीठच होतं. त्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत राहतील. बुधवारी 7 जुलैला सकाळी साडेसात वाजता मुंबईतील हिंदूजा (Hinduja Hospital) हॉस्पिटलमध्ये दिलीप कुमार यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना 29 जूनला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉ. जलील पारकर दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत होते. महान अभिनेत्याच्या आरोग्यासाठी त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत होते. डॉ. पारकर यांनी पीपिंग मून या वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिलीप कुमार यांचं निधन झाल्याची बातमी जेव्हा त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांना दिली तेव्हा त्या हतबुद्धच झाल्या. सायरा बानो म्हणाल्या,‘अल्लाहने माझा आधारच काढून घेतला. साहेबांशिवाय (दिलीप कुमार) मी कुठल्याच गोष्टीची कल्पना करू शकत नाहीए. त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा.’ दिलीप कुमार यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण; सायरा बानो यांनी ती गोष्ट करण्यास दिला नकार सायरा बोना गेली 56 वर्षं सतत दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या वावरत होत्या. त्यांचा प्रेमविवाह, दीर्घकाळ सहवास यामुळे त्यांना आता प्रचंड दु:ख होत आहे. दिलीप कुमार यांचे चाहते पण दु:खात आहेत. सायरा बानो यांच्या मानसिक स्थितीबद्दल महान अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांनीही ट्विटरवर लिहिलं होतं. बुधावारी रात्री उशिरा धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात दिलीप कुमार यांच्या पार्थिवाजवळ असलेल्या सायरा बानो खूपच भावूक झाल्यांचं दिसतं आहे. त्यावर धर्मेंद्र यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘सायरा यांनी जेंव्हा मला सांगितलं कि धर्मेंद बघ साहेबांनी डोळे मिटले. मित्रांनो, माझं अवसानच गळालं. देव माझ्या प्रिय भावाला जन्नतमध्ये स्थान देवो.’ ‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा बुधवारी संध्याकाळी जुहूच्या कब्रस्तानात दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचा दफनविधी झाला. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922ला पाकिस्‍तानातील पेशावर मध्ये झाला होता. दिलीप कुमार यांनी अभिनयाची सुरुवात 1944 मध्ये आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटातून केली. पाच दशकांत त्यांनी 65 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या. दिलीप कुमार यांनी अंदाज (1949), आन (1952), दाग (1952), देवदास (1955), आझाद (1955), मुघल-ए-आझम (1960), गंगा जमुना (1961), राम और शाम (1967) या चित्रपटात काम केलं.
  First published: