मुंबई 7 जुलै: जवळपास सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं. 98 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आपली सर्व स्वप्न पुर्ण केली. (Dilip kumar passed away) एक लोकप्रिय कलाकार झाले, भरपूर संपत्ती मिळवली, जग फिरले, जगभरातील प्रतिष्ठित लोकांना भेटले अगदी स्वप्नवत आयुष्य ते जगले, असं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते. (Dilip Kumar's last wish) परंतु त्यांची ती शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा
दिलीप कुमार यांचं आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या आई-वडिलांचे दफनविधी नाशिकमधील देवळी येथे करण्यात आले होते. याच ठिकाणी किंबहूना पालकांच्या शेजारीच त्यांचा देखील दफनविधी व्हावा अशी त्यांची इच्छा होती. लक्षवेधी बाब म्हणजे आपली ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालकांच्या कबरीशेजारीच त्यांनी स्वत:साठी देखील एक राखीव जागा आधीच बुकिंग करून ठेवली होती. आई-वडिलांच्या सानिध्यात त्यांना स्वर्गप्राप्ती मिळवायची होती. परंतु त्यांची ही इच्छा अखेर अपूर्ण राहिली.
मराठी चित्रपट OTT वर का चालत नाही? स्वप्निल जोशीनं सांगितलं खरं कारण
मिळालेल्या माहितीनुसार दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी देवळी येथे त्यांच्या दफनविधीची तयारी केली होती. परंतु पत्नी सायरा बानो यांनी मात्र त्यास नकार दिला. त्यांनी जुहू येथेच त्यांचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या या निर्णयामुळे दिलीप कुमार यांची शेवटची इच्छा अखेर अपूर्णच राहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dilip kumar, Entertainment