मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

 शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपल्या तरुणपणीची एक आठवण शेअर करत दु:ख व्यक्त केलं.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपल्या तरुणपणीची एक आठवण शेअर करत दु:ख व्यक्त केलं.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपल्या तरुणपणीची एक आठवण शेअर करत दु:ख व्यक्त केलं.

मुंबई 7 जुलै: बॉलिवूडचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वसामान्य चाहत्यांसोबतच देशभरातील सेलिब्रिटींनी देखील त्यांच्यासोबतचे फोटो आणि आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Dilip kumar passed away) दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आपल्या तरुणपणीची एक आठवण शेअर करत दु:ख व्यक्त केलं. शरद पवार दिलीप कुमार यांचे इतके मोठे फॅन होते की त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांनी चक्क सायकलवरुन प्रवास केला होता.

‘कधीही भरून न निघणारं नुकसान झालं’; नरेंद्र मोदींनी वाहिली दिलीप कुमारांना श्रद्धांजली

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहिलं तेव्हाचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. ते म्हणाले, “तेव्हा आम्हाला कळलं होतं की पुण्यातल्या जेजुरीजवळ दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. ते पाहायला आम्ही सायकलवरुन गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली. पुढे विधीमंडळात, राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करुन एखादी दुसरी सभा घेण्यासाठी येत असत. दिलीप कुमार हे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय होते.” विशेषतः इजिप्त, जपान अशा देशांमध्ये तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. असा अनुभव देखील माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सांगितला.

दिलीप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला पेशावरमध्ये झाला होता. त्यांनी 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दित त्यांनी 65 चित्रपटांत काम केलं. दिलीपकुमार यांचा अभिनय असा होता की त्यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं जायचं. नया दौर, मुघल-ए-आझम, राम और शाम, गंगा-जमुना, कर्मा सौदागर असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिले. अभिनेत्री सायरा बानोशी त्यांनी निकाह केला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाझ देऊन गौरवण्यात आलं होतं.

First published:

Tags: Dilip kumar, Entertainment, Sharad pawar