जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Saif Ali Khan : सैफ अली खानवर भाळली होती ब्रुनेईच्या सुलतानाची लेक; 'ही' हिरेजडित वस्तू दिली होती भेट

Saif Ali Khan : सैफ अली खानवर भाळली होती ब्रुनेईच्या सुलतानाची लेक; 'ही' हिरेजडित वस्तू दिली होती भेट

सैफ अली खान

सैफ अली खान

एकेकाळी लाखो मुली सैफच्या रूपावर भाळायच्या. आपल्या एका मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले होते की, एकदा ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीने त्याला करोडोंची भेट दिली होती असा खुलासा केला होता. काय होता तो किस्सा जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जून :   सैफ अली खान खास त्याच्या राजेशाही थाटासाठी  ओळखला जातो. तो खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा नवाब शोभतो. सध्या सैफ दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात लंकेशच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेला खूप पसंती दिली जात आहे. एकेकाळी लाखो मुली सैफच्या रूपावर भाळायच्या पण आजही त्याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. आपल्या एका मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले होते की, एकदा ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलीने त्याला करोडोंची भेट दिली होती असा खुलासा केला होता. काय होता तो किस्सा जाणून घ्या. सैफ अली खानने काही वर्षांपूर्वी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ब्रुनेईच्या सुलतानची मुलगी बॉलिवूडची खूप मोठी फॅन होती. एका हाय-प्रोफाइल भेट आणि शुभेच्छा आणि तिथे मिळालेल्या भेटवस्तूंचा संदर्भ देताना तो म्हणाला होता की, ‘मला, मनीषा कोईराला आणि इतर काही जणांना एका संमेलनासाठी आमंत्रित केले होते. ते लोक खूप श्रीमंत होते. ब्रुनेईच्या सुलतानाच्या मुलीने मला फोन केला आणि मनीषा कोईरालाला लंडनच्या डोरचेस्टर हॉटेलमध्ये बोलावले.’

News18लोकमत
News18लोकमत

पुढे सैफ म्हणाला, ‘ब्रुनेईच्या सुलतानने आमच्यासाठी एक खास पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये त्यालाही आमंत्रित करण्यात आले होते. सैफने सांगितले की, सुलतानची मुलगी बॉलिवूडची फॅन होती. त्या कार्यक्रमात तिने सैफला एक महागडी भेट दिली होती. तो पुढे म्हणाला, ‘मी आशा करतो की, ब्रुनेईचा सुलतान मला मारणार नाही. त्या लोकांनी वापरलेल्या गोष्टी पाहून मीही हैराण झालो होतो. ते मायकेल जॅक्सनला गाण्यासाठी आमंत्रित करत करतात, तो खूप श्रीमंत आहे. मला आठवतंय एकदा त्याने आम्हाला फोन केला होता. मी, मनीषा कोईराला आणि इतर काही जण त्यांना लंडनमधील डॉर्चेस्टर हॉटेलमध्ये भेटलो.’ Adipurush: रावण आणि माता सीतेमधील तो सीन पाहून प्रेक्षक संतप्त; वाद वाढताच निर्मात्यांनी दिलं असं स्पष्टीकरण सैफ अली खानने आपली कहाणी आठवून सांगितले की, एक मोठी खुर्ची आणि एक छोटी खुर्ची होती. मी जास्त विचार केला नाही आणि मोठ्या खुर्चीवर जाऊन बसलो, पण ही खुर्ची सुलतानासाठी राखीव ठेवली होती. जेव्हा त्यांची मुलगी भेटायला आली तेव्हा तिने फोटो काढला आणि जाण्यापूर्वी मला एक बॉक्स दिला. मी बॉक्स उघडला तेव्हा त्यात सोन्याचे आणि हिऱ्याने जडवलेले रोलेक्सचे घड्याळ होते. बरं आता ते घड्याळ माझ्या बायकोकडे आहे. रमेश तौरानी यांच्या ‘रेस’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी हे घड्याळ विकण्याचा प्रयत्न केला असला, तरी ‘सर, हे तुमच्यासाठी आहे’, असे मी त्यांना सांगितले होते.’ आदिपुरुषमधील सैफच्या लूकपासून त्याच्या पुष्पक विमानापर्यंत, प्रत्येक गोष्टीसाठी त्याला ट्रोल केले जात आहे. रावणाच्या भूमिकेतील सैफच्या लूकची तुलना अलाउद्दीन खिलजीशीही झाली होती. या चित्रपटाबाबत लोकांकडूनही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात